बापरे! कारमध्ये घुसला 7 फुटांचा अजगर; चालकाने बोनेट उघडताच...थरारक Video पाहा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Python In Car Viral Video
7 Foot Python Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजगराचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल झालाय

point

कारच्या बोनेटमध्ये असलेल्या अजगराची सुटका कशी झाली?

point

अजगराचा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडल्याशवाय राहणार नाही

Big Python Shocking Video Viral : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे एका कारच्या बोनेटमध्ये 7 फुटांचा अजगर घुसल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झालाय. कार गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आली होती. गॅरेजच्या मॅकेनिकने बोनेट उघडल्यावर असं काही घडलं, ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या अजगराला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. अजगराचे हे थरारक दृष्य कॅमेरात कैद झालं असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (A shocking video of a 7 foot python crawling into the bonnet of a car in Prayagraj, Uttar Pradesh Video went viral)

प्रयागराजमध्ये असलेल्या सिव्हिल लाईन्स हॉटेलच्या बाहेर असलेल्या गॅरेजमध्ये हा अजगर आढळून आला. महेंद्र स्कॉरपीयओ कारमध्ये हा अजगर आढळल्याचं सांगितलं जात आहे. कारटच्या बोनेटमध्ये अजगर दिसताच गॅरेजच्या मालकाने 112 क्रमांकावर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने सक्रिय राहून घटनास्थळावरून अजगराची सुटकी केली.

हे ही वाचा >>Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार, पण कधी अन् किती वाजता?

इथे पाहा विशाल अजगराचा भयानक व्हिडीओ


अजगराचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, एका कारमध्ये भला मोठा अजगर विळखा घालून बसला आहे. वनविभागाचे अधिकारी कारचा बोनेट जेव्हा उघडतात, त्यावेळी हा साप कारच्या बॅटरीजवळ असल्याचं दिसतं. सापाचा रेस्क्यू पाहण्यासाठी अनेक जण घटनास्थळी दाखल झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अजगर खूप जड असून या सापाला उचलण्यात अधिकाऱ्यांना समस्या येत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पण अधिकारी सापाच्या शेपटीला धरतात आणि त्याला सुरक्षीत ठिकाणी सोडून देतात. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Virat Kohli vs Babar Azam: विराट कोहली की बाबर आझम? 114 इनिंगनंतर कोण आहे 'वनडे'चा किंग?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT