कुटुंबियांना धमक्या, घर सोडण्याची वेळ, अभिजीत दिपकेंचा तो इशारा कुणाला?
abhijit dipke : दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके वर्षभरानंतर कुटुंबीयांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. आंदोलन देशभर नेण्याचा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कुटुंबियांना धमक्या, घर सोडण्याची वेळ
अभिजीत दिपकेंचा तो इशारा कुणाला?
Abhijit Dipke : वर्षभराच्या कालावधीनंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आपल्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी घरी परतले आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. त्यांच्या आगमनानंतर कुटुंबीयांनी हार घालून आणि औक्षण करून त्यांचे स्वागत केले. वर्षभरानंतर घरात परतलेल्या दीपके यांना पाहून कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अभिजीत दीपकेही भावूक झाल्याचे दिसून आले. दीर्घ काळानंतर आई-वडील आणि कुटुंबीयांची भेट होत असल्याने त्यांची उत्सुकता स्पष्टपणे जाणवत होती. आंदोलन आणि विविध उपक्रमांमुळे घरापासून दूर राहिलेल्या दीपकेंसाठी हा क्षण विशेष ठरला.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात तुफानी पावसाची शक्यता, 26 जिल्ह्यांना मोठा अलर्ट
'गेल्या पंधरा दिवसांत कुटुंबीयांना त्रास दिला गेला'
घरी परतण्यापूर्वी अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या पोस्टमध्ये त्यांनी आपण आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी जात असल्याचे सांगितले होते. त्यांना भेटून एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या पंधरा दिवसांत त्यांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागल्याचा दावा त्यांनी केला. तसेच धमक्यांमुळे घर सोडावे लागल्याचेही त्यांनी म्हटले. आता त्यांना पुन्हा घरी परत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जंतरमंतरवरील आंदोलन हे केवळ ट्रेलर असल्याचे सांगत मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या लोकांचे त्यांनी आभारही मानले होते.
हेही वाचा : नागपूर: पिकनिकला गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू, बापासह लेकाचा समावेश









