Mumbai Weather Update: मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रात वरुणराजा कुठे-कुठे बरसणार?
Maharashtra Weather Update: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जाणून घ्या मुंबईसह महाराष्ट्रातील हवामान नेमकं कसं असेल.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पाहा मुंबई आणि महाराष्ट्र कसं असेल आजचं हवामान
मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार
Maharashtra Weather Update: मुंबई: मुंबई आणि उपनगरात येत्या काही तासात मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर कोकणात काही तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक धरण क्षेत्रामध्येही पर्जन्यमान चांगलं झाल्याने पिण्याच्या पाण्याचीही चिंता मिटली आहे. याशिवाय पुढील 24 तासात मुंबई आणि उपनगरात आणि उर्वरित महाराष्ट्रात हवामान नेमकं कसं असेल हे सविस्तर जाणून घेऊया. (accurate forecast of rain in mumbai and maharashtra weather news meteorological department weather forecast for next 24 hours 16th july 2024 heavy rain forecast in mumbai today)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र हवामान अपडेट (Maharashtra Weather Alert)
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हवामानाचे अंदाज आणि मुंबईतील पावसाचा नेमका अंदाज
मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अधूनमधून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30°C आणि 25°C च्या आसपास असेल.
हे वाचलं का?
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
ADVERTISEMENT
विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज पाहासाठी View PDF इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT