‘…त्याच हेलिकॉप्टरने इतर शेतकऱ्यांकडेही बघा’, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यावर तोफ डागली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray ahmednagar draught tour cm eknath shinde
Uddhav Thackeray ahmednagar draught tour cm eknath shinde
social share
google news

Uddhav Thackeray : राज्यात ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारली, त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी अडचणीत सापडले. तर काही भागात दुबार पेरणीही करावी लागली तरीही पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा संकटांशी सामना करावा लागला. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहदनगर जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी अनेक शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकरावर जोरदार टीका केली आहे.

ADVERTISEMENT

दुबार पेरणीनंतरही नुकसान

अहमदनगर जिल्ह्यात पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच राज्य सरकार हे तिरबागडं सरकार असल्याने दुष्काळातही शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. नुकसान होऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या विम्याचे हक्काचे पैसे मिळाले नाहीत. तरीही हे सरकार शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मश्गुल असल्याचा घणाघात त्यांनी सरकारवर केला आहे.

हे ही वाचा >> India Alliance: ‘…तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच’, प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तोफ डागली

विम्याचे पैसे कधी मिळणार

पाऊस झाला नसल्यामुळे राज्यातील अनेक भागात शेतीला मोठा फटका बसला आहे. ऐन हंगामातच पाऊस झाला नसल्याने पिके सगळी वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. दुबार पेरणीनंतरही पाऊस झाला नसल्याने शेतीला दुहेरी फटका बसला आहे. त्यामुळे एक रुपयामध्ये विमा देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना विम्याचे पैसे तात्काळ द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता विम्याचे पैसे शेतकऱ्यांनी कधी मिळणार असा सवालही त्यांनी केला आहे.

हे वाचलं का?

आराम करण्यासाठी हेलिकॉप्टरने जातात

मुख्यमंत्री आराम करण्यासाठी हेलिकॉप्टरने आपल्या शेतात जातात. मात्र राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याच हेलिकॉप्टरने इतर शेतकऱ्यांकडेही जावं असा टोला त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.

हे ही वाचा >> Maratha Morcha : ‘तुम्ही जर असं केलं तर आरक्षण द्यायचं कुणाला?’ जरांगे पाटलांचा भावूक सवाल

शेतकऱ्यांच्याही बांधावर जा

सरकार आपल्या दारी म्हणत एकनाथ शिंदे यांच्याकडून दौरे केले जातात. मात्र या सरकारमधील ना पालकमंत्री आपल्या जिल्ह्याकडे लक्ष देतात. ना कृषी मंत्री लक्ष देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आता भरुन कसे निघणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शेतकऱ्यांची पीकं वाळून आणि करपून गेली तरीही या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही. त्यामुळे हे सरकार निघृण असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT