Ajit Pawar Amol Kolhe : “हिंमत उरली नाही का?”; कोल्हेंचा अजित पवारांवर पहिला वार

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

amol kolhe attacks on ajit pawar over onion export ban
amol kolhe attacks on ajit pawar over onion export ban
social share
google news

Amol Kolhe Ajit Pawar Shirur Lok sabha Constituency election 2024 : शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचा निर्धार अजित पवारांनी केला. त्यांनी दिलेल्या आव्हानानंतर अमोल कोल्हेंनी पहिल्यांदाच पलटवार केला. पुण्यातील खेड तालुक्यात शेतकरी आक्रोश मोर्चाची सभा झाली. यावेळी बोलताना अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या हिंमतीवरच प्रश्न उपस्थित केला.

ADVERTISEMENT

अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. आक्रोश मोर्चाच्या पहिल्याच दिवशी खासदार कोल्हेंनी अजित पवारांवर बाण डागले.

बावनकुळेंच्या विधानावरून भाजपवर हल्ला

अमोल कोल्हे म्हणाले, “महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जात आहेत; तेव्हा लय जणांच्या पोटात मळमळायला लागलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की, या शेतकरी आक्रोश मोर्चाने काहीच होणार नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. बुरखा आपल्या माणसाने फाडला तर जास्त चांगला असतो. त्याच प्रकारे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांचा पक्ष हा शेतकरी विरोधी आहे हे जनतेसमोर आणले. त्यांना फक्त खाणाऱ्यांची काळजी आहे.”

हे वाचलं का?

लाचार म्हणत अजित पवारांना उलट सवाल

भाजपसोबत सत्तेत जाण्याचे कारण सांगताना अजित पवार सतत विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगतात. याच मुद्द्यावर बोट ठेवत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना उलट सवाल केला आहे. अजित पवार गटाला लाचार संबोधत कोल्हेंनी घेरलं.

हेही वाचा >> तारीख अन् मार्ग ठरला! मराठा आंदोलन असं धडकणार मुंबईत?

“दुधाचा जोडधंदा हा शेतकऱ्यांच्या रोजच्या खर्चासाठी महत्वाची बाब आहे. फक्त कांद्याचा आपण जर विचार केला तर ७ डिसेंबर पासून कांद्यावर निर्यात बंदी लादल्यापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे बाराशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जे कोणी विकासासाठी इकडून तिकडे गेले आहेत, त्यांनी सांगावे की छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्यांच्या मावळ्यांमध्ये केंद्र सरकारला विचारण्याची हिंमत उरली नाही का? आमच्या शेतकऱ्यांचे बाराशे कोटी रुपयांचे नुकसान का केले? निर्यात बंदी आधी उठवा दुर्दैव आहे की ही ताकद उरली नाही. लाचारीने जेव्हा पाय धरण्याची मानसिकता होते, तेव्हा नजरेला नजर मिळवण्याची हिंमत राहत नाही ही वस्तुस्थिती आहे”, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर पहिला वार केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> बच्चू कडू एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना देणार धक्का?

“जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात फितुरी करण्यासाठी कारभारी मंडळींकडून हंबीरराव मोहिते यांना सांगितलं जात होतं. पण मोहिते यांनी ईमानाची बाजू घेतली, कारण त्यांचे इमान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी होतं आणि शिवाजी महाराजांचे ईमान रयतेच्या कल्याणाशी बांधलेले होते. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात व त्याची प्रतीक्षा सर्वांना आहे”, असा इतिहासाचा दाखल देत कोल्हेंनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले.

हेही वाचा >> खैरे-दानवेंनी वाढवला ठाकरेंचा ताण, मातोश्रीवरील बैठकीत काय झालं?

“औरंगजेबाच्या मनात होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व स्वीकारले, तर त्यांना दख्खनची सुभेदारी द्यायची. पण शिवाजी महाराजांनी दिल्लीश्वरांचे मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा तत्त्वांच्या पाठीशी उभे राहणे पसंत केले. त्यासाठी त्यांनी संघर्षाची वाट पत्करली. त्यामुळे आज साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या शक्तिमान सरकारच्या एकाही मंत्र्याला कांद्यावरील निर्यात बंदी उठवा असे केंद्र सरकारला सांगता आले नाही”, असे सांगत कोल्हेंनी महायुती सरकारला लक्ष्य केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT