Anant Chaturthi 2024: यंदा कधी आहे बाप्पाचं विसर्जन? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनंत चतुर्दशी तिथी, पूजा शुभ मुहूर्त

point

गणपती विसर्जन मुहूर्त

point

गणेश विसर्जनाची योग्य पद्धत माहितीये का?

Ganesh Visarjan Muhurta 2024 : भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला म्हणजेच 07 सप्टेंबर 2024 रोजी गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन होणार आहे. त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर 2024 रोजी लाडक्या बाप्पाचं विसर्जन होईल. यालाच अनंत चतुर्थी असंही म्हणतात. चला मग बाप्पाच्या विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे जाणून घेऊयात. (Anant Chaturthi ganesh visarjan 2024 visarjan date correct muhurata)

हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला जितके महत्तव आहे तितकेच महत्त्व अनंत चतुर्थीलाही आहे. यंदा अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पाचं विसर्जन 17 सप्टेंबर रोजी आहे. 

हेही वाचा : Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमसोबत आमदार पती वागला गुलीगत; म्हणाल्या त्याने…

अनंत चतुर्दशी तिथी, पूजा शुभ मुहूर्त

अनंत चतुर्दशीचा प्रारंभ 16 सप्टेंबर 2024 दुपारी 03 वाजून 10 मिनिटांनी होईल. तर, 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाईल. अनंत चतुर्दशीला पूजा मुहूर्त सकाळी 06:07 ते 11:44 पर्यंत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गणपती विसर्जन मुहूर्त

  • सकाळचा मुहूर्त- सकाळी 09 वाडू 11 मिनिटे ते दुपारी 01 वाजून 47 मिनिटांपर्यंत

  • दुपारचा मुहूर्त- दुपारी 03 वाजून 19 मिनिटे ते 04 वाजून 51 मिनिटांपर्यंत 

  • ADVERTISEMENT

  • संध्याकाळचा मुहूर्त- संध्याकाळी 07 वाजून 51 मिनिटे ते रात्री 09 वाजून 19 मिनिटांपर्यंत
  • रात्रीचा मुहूर्त- रात्री 10 वाजून 47 मिनिटे ते 18 सप्टेंबर रोजी पहाटे 03 वाजून 12 मिनिटांपर्यंत
  • हेही वाचा : Baramati News : लाडक्या बहिणी साड्या न घेताच निघून गेल्या! युगेंद्र पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ, काय घडलं?


    श्री गणेश विसर्जन मंत्र 1

    यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।

    ADVERTISEMENT

    इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥

    श्री गणेश विसर्जन मंत्र 2

    गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर।

    मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥

    गणेश विसर्जनाची योग्य पद्धत माहितीये का?

    • श्रीगणेशाची विधिवत पूजा केल्यानंतर हवन करा आणि नंतर गणेशाचे स्वस्तिवाचन करा.
    • आता पाट घ्या आणि त्यावर स्वस्तिक बनवा. नंतर तो तसाच ठेवावा, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे कापड त्यावर पसरून चारही कोपऱ्यात पूजेसाठी सुपारी ठेवावी.
    • आता मूर्ती जिथे ठेवली होती तिथून उचला आणि आनंदाच्या जयघोषात यावर बसवा.
    • आत गणपती बाप्पासमोर फळे, फुले, सुपारी आणि मोदक ठेवा.
    • यानंतर हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करा. पूजेच्या 10 दिवसात काही चूक झाली असेल तर माफी मागा.
    • आता सर्वांनी गणपती बाप्पाचं नाव घेत बाप्पाला डोक्यावर किंवा खांद्यावर पाटासह विसर्जनस्थळी घेऊन जल्लोषात घरातून निरोप घ्यावा.
    • विसर्जनाच्या ठिकाणी लक्षात ठेवा की बाप्पाची मूर्ती फेकून देऊ नये, तर पूर्ण आदराने विसर्जन करावे. यानंतर हात जोडून माफी मागून पुढच्या वर्षी येण्याची विनंती करा. विसर्जनाच्या वेळी कापूर लावून त्याची आरती करावी.

    हेही वाचा : Optical Illusion : वाटतं तितकं सोपं नाही! हुशार असाल तर शोधून दाखवा फोटोत लपलेली मांजर

     

    घरी गणेशमूर्तीचे विसर्जन कसे करावे...

    • जर तुम्ही घरातच विसर्जन करत असाल तर वर दिलेल्या संपूर्ण प्रक्रियेचे अनुसरण करा.
    • निर्माल्य एकाच ठिकाणी गोळा करून योग्य ठिकाणी विसर्जित करावे.
    • घरात विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातील कुंडीत किंवा बागेत पाणी आणि माती विसर्जित करावी.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT