Govt Jobs : SBI मध्ये पदवीधरांसाठी मोठी भरती, लगेच करा अर्ज
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याअंतर्गत देशभरातील विविध शाखांमध्ये एकूण 7,150 जागा भरल्या जाणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Govt Jobs : SBI मध्ये पदवीधरांसाठी मोठी भरती
लगेच करा अर्ज
SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याअंतर्गत देशभरातील विविध शाखांमध्ये अप्रेंटिस पदाच्या एकूण 7,150 जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती 19 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. सुरुवातीला अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 जून 2026 निश्चित करण्यात आली होती, मात्र उमेदवारांच्या सोयीसाठी ही मुदत वाढवून 15 जून 2026 पर्यंत करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच NAPS पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
वयाची अट आणि मानधन
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2026 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्ष कालावधीचे ऑन-द-जॉब प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांना दरमहा 15,000 रुपये इतके मानधन दिले जाईल. मात्र या कालावधीत इतर कोणतेही भत्ते किंवा अतिरिक्त लाभ मिळणार नाहीत.
हे ही वाचा : Astrology : त्रिपुष्कर योग 2026, 'या' राशीचे भाग्य खुलणार
काय आहेत निकष?
उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा, स्थानिक भाषेची चाचणी आणि वैद्यकीय तपासणी यांच्या आधारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षा जुलै 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना (NAPS) पोर्टलवर अनिवार्यपणे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराने यापूर्वी SBI किंवा इतर कोणत्याही संस्थेमध्ये अप्रेंटिसशिप केलेली नसावी तसेच सध्या कोणत्याही अप्रेंटिसशिप प्रशिक्षणात सहभागी नसावा.
हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांनो, काळजी घ्या! यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्र खवळणार; बीएसीनं काय सांगितलं?
अनुभव, सिबिल...
भरती प्रक्रियेसाठी काही महत्त्वाच्या अटीदेखील घालण्यात आल्या आहेत. शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीचा प्रशिक्षण अथवा नोकरीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. तसेच बँक, एनबीएफसी, वित्तीय संस्था किंवा क्रेडिट कार्डच्या कर्जाची थकबाकी असलेल्या आणि ती अद्याप नियमित अथवा पूर्णपणे फेडलेली नसलेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी अपात्र ठरविण्यात येईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सर्व पात्रता व अटी काळजीपूर्वक तपासून 15 जून 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन SBI कडून करण्यात आले आहे.









