Bank Holiday : जूनमध्ये 'इतक्या' दिवस बँका राहणार बंद, पाहा संपूर्ण यादी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 bank holiday in june 2024 bank closed for 12  days know the full list of holiday rbi website
जूनच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
social share
google news

Bank Holiday June 2024 : आरबीआय (Reserve Bank of India)दर महिन्याच्या सुरूवातीला बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते असते. त्यानुसार आता जूनची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जून महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या तसेच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश असतो. त्यामुळे या सुट्ट्या पाहूनच तुम्ही तुमच्या बँकेची काम आवरून घ्या. (bank holiday in june 2024 bank closed for 12  days know the full list of holiday rbi website) 

ADVERTISEMENT

जून महिन्यात 9 तारखेला महाराणा प्रताप यांच्या जयंती असणार आहे. आणि वट पोर्णिमा ही 21 जूनला असणार आहे. यासह जून महिन्यात एकूण 5 रविवार असल्याने बँक कर्मचाऱ्यांना या दिवशी साप्ताहिक सुट्टी असेल. तर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुमचं जूनमध्ये बँकेशी संबंधित काही काम असेल, तर नक्कीच येथे सुट्ट्यांची यादी तपासा जेणेकरून तुमची कोणतीही गैरसोय होणार नाही. 

हे ही वाचा : महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभेचा एक्झिट पोल किती अचूक ठरला?

'या' दिवशी बँका बंद असणार? 

1 जून : मतदान असणार राज्यात बँका बंद असणार आहेत. 
2 जून : रविवार 
8 जून : दुसरा शनिवार 
9 जून : रविवार
10 जून : श्रीगुरु अर्जुन देवजींच्या हौतात्म्य दिनानिमित्त पंजाबमध्ये बँका बंद राहणार आहेत.
14 जून : ओरिसामध्ये बँका बंद असणार आहेत. 
15 जून : मिझोराम या ईशान्येकडील राज्यामध्ये YMA दिवस आणि ओडिशातील राजा संक्रांतीमुळे बँका बंद राहतील. 
16 जून : रविवार 
17 जून : बकरी ईद निमित्त काही राज्ये वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत. 
21 जून : वटपोर्णिमेनिमित्त अनेक राज्यात बँका बंद राहणार आहेत.
22 जून : चौथा शनिवार असल्याने बँका बंद 
23 जून :  रविवार
30 जून : रविवार

हे वाचलं का?

दरम्यान वरील बँकांची सुट्ट्या पाहून बँकांचे कामकाज आटपा, नाहीतर तुमची गैरसोय होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Monsoon 2024 : गुड न्यूज! 'या' दिवशी मान्सून येणार महाराष्ट्रात

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT