IAS Pooja Khedkar Mother : मनोरमा खेडकर यांना झटका! कोर्टाने मागणी फेटाळली

मुंबई तक

ADVERTISEMENT

कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

point

पूजा खेडकर यांची जामीन याचिका फेटाळली

point

पूजा खेडकरांच्या आईला तुरुंगातच राहावे लागणार

Manorama Khedkar Latest News : (ओमकार वाबळे, पुणे) वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना कोर्टात दिलासा मिळू शकला नाही. मनोरमा खेडकर यांची याचिका कोर्टाने फेटाळली असून, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Manorama Khedkar Bail petition Rejected by court)

ADVERTISEMENT

मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवत मनोरमा खेडकर यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. फरार असलेल्या मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. 

२० जुलै रोजी त्यांची पोलीस कोठडी संपली होती. कोर्टाने २२ जुलैपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ केली होती. सोमवारी (22 जुलै) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

हे वाचलं का?

कोर्टाने जामीन याचिका फेटाळली

मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सोमवारी सुनावली. त्यानंतर मनोरमा खेडकर यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

सात जणांविरुद्ध गुन्हा

मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून मनोरमा खेडकर यांनी धमकावले होते. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा, वडील दिलीप खेडकर, अंगरक्षक यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. 

ADVERTISEMENT

बंगल्यात सापडली तीन काडतुसे

मनोरमा खेडकर फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नॅशनल हाऊसिंग सोसायटीत असलेल्या बंगल्याची झडती घेतली होती. यावेळी त्यांच्या बंगल्यात पिस्तुलासह तीन काडतुसे सापडली होती. पोलिसांनी ती जप्त केली. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT