Buldhana: समृद्धी महामार्गावर 26 प्रवाशी जागीच ठार, अपघातानंतर बस जळून खाक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra Buldhana Sindkhed Raja 26 passengers died on the spot in an accident in a private bus on the Samruddhi Highway
Maharashtra Buldhana Sindkhed Raja 26 passengers died on the spot in an accident in a private bus on the Samruddhi Highway
social share
google news

Breaking News Maharashtra Marathi: ज़का खान/इसरार चिश्ती: बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Sindkhed Raja) शहराजवळ झालेल्या भीषण बस अपघातात (Bus Accident) तब्बल 26 प्रवाशी जागीच ठार (26 passengers Death) झाल्याची धक्कादायक घटना आज (1 जुलै) पहाटेच्या सुमारास घडली. समृद्धी महामार्गावर (samruddhi highway) हा भीषण अपघात झाला आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची एक लक्झरी बस नागपूरहून मुंबईकडे जात होती. पण पहाटेच्या सुमारास जो भीषण अपघात झाला त्यानंतर बसने तात्काळ पेट घेतला. अपघाताबाबत काही समजण्याआधीच तब्बल 26 जणांनी आपला जीव गमवला होता. (buldhana sindkhed raja 26 passengers died on the spot private bus accident samruddhi highway fire maharashtra breaking news in marathi)

बुलढाणा एसपी सुनील कडासेन यांनी सांगितले की, बसमध्ये एकूण 33 लोक होते, त्यापैकी 3 चिमुकल्या मुलांसह 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 7 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती देताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या बसचा टायर अचानक फुटला आणि बस आधी खांबाला आणि नंतर दुभाजकाला धडकली. ज्यामुळे बसने पेट घेतला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एसपीसह अनेक अधिकारी घटनास्थळी

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह अनेक उच्चपदस्थांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. या घटनेत बसचा चालक बचावला आहे. त्यांनी सांगितले की, टायर फुटल्यानंतर बस अनियंत्रित झाली, त्यानंतर बस उलटली आणि आग लागली.

हे ही वाचा>> सख्ख्या काकाने प्रायव्हेट पार्ट कापून केली पुतण्याची हत्या, तेही लग्नाच्या 2 दिवस आधी..

लोकांनी तातडीने पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रुग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले. महामार्गावर तैनात आपत्कालीन वैद्यकीय पथकासह अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी तातडीने जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात नेले.

ADVERTISEMENT

रात्री दीड वाजता झाला अपघात

त्याचवेळी पोलिसांनी सांगितले की, अपघातग्रस्त लक्झरी बस ही नागपूरहून मुंबईकडे जात असताना पिंपळखुटा गावाजवळ पहाटे दीडच्या सुमारास खांबाला धडकून दुभाजकाला धडकली ज्यानंतर तिला आग लागली. दरम्यान, या अपघातात जे 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रवासी नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील रहिवासी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री शिंदे यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा बस अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळी भेट देणार आहेत. अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून फोनवरून घटनेची माहिती घेतली. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जखमींवर तात्काळ शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

बुलढाणा बस दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हे ही वाचा>> Beed Accident News : अंत्यविधीला निघाले पण तिघांनी गमावला जीव, पुण्यावरून निघालेल्या कारचं झालं तरी काय?

बसची खिडकी तोडून पाच प्रवासी बाहेर आले

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने सांगितले की, ‘माझ्या शेजारी बसलेला प्रवासी आणि मी मागील खिडकी तोडून बाहेर आलो. बसची खिडकी तोडून चार ते पाच प्रवासी बाहेर आले, मात्र इतर प्रवाशांना बाहेर पडता आले नाही, असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. अपघातानंतर लोकांनी महामार्गावरील इतर वाहनांची मदत मागितली, मात्र कोणीही थांबले नाही. पिंपळखुटा येथील या मार्गावर अनेक अपघात झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT