Chandrapur : सहा महिन्याच्या बाळाने गिळली काजळाची डबी, अन्..., चिमुरड्यासोबत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

chandrapur shocking story six month old baby swallowed a box of kajal facing breathing issue how doctor remove from body
घरातील एका बाळाने खेळता खेळता काजळाची डबी गिळल्याची घटना घडली
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाळाने खेळता खेळता काजळाची डबी गिळल्याची घटना

point

डबी गिळल्याने बाळाला श्वास घेण्यास त्रास झाला

point

बाळाची डबी पासून कशी सुटका झाली आहे?

Chandrapur News : विकास राजूरकर, चंद्रपूर :  घरात लहान मुलं असलं की त्याची विशेष काळजी घ्यावीच लागते. आणि जर त्या बाळाकडे दुर्लक्ष झालं तर कोणतीही भयानक घटना घडण्याची शक्यता असते. असाच अनुभव आता चंद्रपुर जिल्ह्यातील मेश्राम कुटुंबाला आला आहे. कारण त्याच्या घरातील एका बाळाने खेळता खेळता काजळाची डबी गिळल्याची घटना घडली आहे. ही डबी गिळल्याने बाळाला श्वास घेण्यास त्रास झाला होता. त्यामुळे कुटुंबियांनी बाळाला डॉक्टरांकडे नेले होते. त्यामुळे या बाळाची डबी पासून कशी सुटका झाली आहे? हे जाणून घेऊयात. (chandrapur shocking story six month old baby swallowed a box of kajal facing breathing issue how doctor remove from body) 

ADVERTISEMENT

चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील मेश्राम कुटुंबातील एका बाळाने खेळता खेळता काजळीचा डबा गिळल्याची घटना घडली होती. हा डब्बा गिळल्यानंतर कुटुंबियातील व्यक्तींनी तो हातानी काढायचा प्रयत्न केला होता. मात्र त्या प्रयत्नात हा डब्बा थेट जाऊन बाळाच्या श्वसन नलिकेत अडकला होता. त्यामुळे बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे बाळाची अवस्था चांगलीच बिघडली होती आणि हे पाहून कुंटूंबिय घाबरले होते. त्यानंतर कुटुंबियांनी तत्काळ बाळाला रुग्णालयात दाखलं केलं होतं. 

हे ही वाचा : Vidhan Sabha Election 2024: उल्हासनगरमध्येही शरद पवार टाकणार नवा डाव, भाजपला आणणार अडचणीत?

या घटनेत चंद्रपूरचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ.मनिष मुंद्रा यांनी बाळाची नाजूक स्थिती पाहून त्याच्यावर तात्काळ उपचार करत गळ्यात अडकलेली पेटी बाहेर काढली. त्यामुळे मुलाची त्या काजळाच्या डबी पासून सूटका झाली होती. मुलाला तात्काळ उपचारामुळे मुलाचे प्राण वाचले आहेत. सुदैवाने पेटी श्वसन नलिकेत अडकूनही बाळाचा श्वासोच्छवास सुरूच होता आणि उपचारासाठी वेळ मिळाल्याने बालकाचा जीव वाचवण्यात यश आले.

हे वाचलं का?

बाळाला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्याने हे शक्य झाले. अन्यथा अनर्थ घडला असता. या घटनेनंतर डॉक्टरांनी, ज्या घरांमध्ये लहान मुले आहेत, त्यांनी घरामध्ये वस्तू पसरवून ठेऊ नका, असे आवाहन पालकांना केले आहे. 

हे ही वाचा : Satara Crime : प्रेयसीला आधी घरात बोलावलं, नंतर बिल्डिंगवरुन खाली ढकललं..., प्रियकराने का केली हत्या?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT