Maharashtra Politics : बंडानंतर छगन भुजबळांचा शरद पवार, जयंत पाटलांवर घणाघात
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन सुरू केलं आहे. छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला केला.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics, Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन सुरू केलं आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादीवर दावा सांगितला असून, पार पडलेल्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला केला.
ADVERTISEMENT
छगन भुजबळ म्हणाले, “40 पेक्षा आमदार इथे उपस्थित आहेत. काही ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. काही आजारी आहेत आणि काही परदेशात आहेत. या सगळ्यांचे प्रतिज्ञापत्र आहेत. हे खरं आहे की, लोक म्हणताहेत की तुमच्यावर कारवाई होईल. शरद पवारांनंतर मी सुद्धा 57-58 वर्षांपासून काम करतोय. हे सगळे ज्येष्ठ आहेत. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काम कसं करू? कायदे आम्हालाही कळतात. त्यामुळे कारवाईबद्दल जे बोललं जातंय त्याचाच विचार करूनच पुढचं पाऊल टाकलेलं आहे.”
आम्ही विचार करून हे केलंय
“सकाळी उठलो आणि मंत्रिपदाची शपथ घेऊ असं झालेलं नाही. काय प्रक्रिया, सर्वोच्च न्यायालयाचा काय निकाल आहे, या सगळ्यांचा विचार करूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे पाऊल उचलेलं आहे. कार्यकर्तेही आमच्यासोबत आहेत. येत्या काही दिवसांत काही नियुक्त्या होतील”, असं भुजबळ म्हणाले.
हे वाचलं का?
वाचा >> ‘प्रफुल पटेलांना ‘हा’ अधिकारच नाही’, सुप्रिया सुळेंनी सांगितली पक्षाची घटना
“मुंबईतील बैठकीत अजित पवारांनी सांगितलं की, मुंबईचे अध्यक्ष नेमले नाहीत. महिला अध्यक्ष नेमत नाही आहात. निवडणुका जवळ आल्या, काम कसं करायचं. पवार साहेबांनी सांगून सुद्धा तिथले कारभारी नेमणुकाच करतच नव्हते. दोन-चार महिने सांगूनही नेमणुका केल्या नाही. काम कसं करणार?”,
अनेकांचा आग्रह म्हणून हा निर्णय घेतला
“15 दिवस वाट बघितली काही होतंच नव्हतं. शेवटी काही निर्णय घ्यावे लागले. आमदारांचा आग्रह होता. कार्यकर्त्यांचा आग्रह होता. हे काम आजच सुरु झालेलं नाही. काही महिन्यांपासून याची प्रक्रिया सुरू झाली होती. 1999 साली, जेव्हा पक्षाची स्थापना झाली. मी प्रदेशाध्यक्ष होतो. षणमुखानंद हॉल आणि शिवाजी पार्कवरील सभाचं नियोजन समीर आणि पंकजने केलं होतं. आजही त्यांनी व्यवस्था केली”, असं भुजबळ म्हणाले.
ADVERTISEMENT
वाचा >> दिल्लीवाल्यांची लाथ व फडणवीसांचा बुक्का”, एकनाथ शिंदेंवर ‘ठाकरें’चा हल्ला
“1999 नंतर इंडिया शायनिंगचा नारा दिला गेला. त्यावेळी जर प्रचाराला वेळ मिळाला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष झाला असता. काँग्रेसबरोबर आघाडी झाली. काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री झाला. मी प्रदेशाध्यक्षपदाचा मी राजीनामा दिला. का तर उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय म्हणून”, असं म्हणत भुजबळांनी इतिहास सांगितला.
ADVERTISEMENT
आमच्या निवडणुका कशाला घेता?
“बबन पाचपुतेंना जबाबदारी दिली. दादांनी त्यादिवशी कुणी किती दिवस काम केलं ते सांगितलं. आताचे जे आमचे प्रदेशाध्यक्ष ते साडेपाच वर्षांपासून आहेत. तीन वर्षांनी निवडणुका व्हायला पाहिजे. आम्ही सांगतोय सगळ्यांच्या निवडणुका घ्या. पण, प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक घ्यायची नाही. मग आमची निवडणूक कशाला घेता”, असं म्हणत छगन भुजबळ यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला.
“तुम्ही हलणार नाही आणि बाकीच्यांना सांगता आहात की बदलायचं आहे, भाकऱ्या फिरवायच्या आहे. अरे पण मेन रोटला बसलेला आहे, तो फिरवायचा की नाही? त्यांना तरी समजायला पाहिजे. त्यामुळे हे हळूहळू हे झालं. काही वेळी काही गोष्टी होतात”, असं टीकास्त्र भुजबळ यांनी जयंत पाटलांवर केला.
“1999 साली काँग्रेपासून दूर झालो. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. निवडणुकीनंतर पुन्हा आम्ही काँग्रेससोबत गेलो. पवार पुन्हा काँग्रेसच्या मंत्रिमंडळात गेले. देशासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही त्यांच्यासोबत गेलो. मग असं काय झालं की, 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढण्याचं कारण काय? तिकडे भाजपने शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडली का? अजूनही लोकांना कळत नाहीये. आपण काँग्रेसबरोबर राहिलो असतो, आपल्याला बहुमत मिळालं असतं. काय झालं माहिती नाही”, असं म्हणत शरद पवारांच्या निर्णयांवर शंका उपस्थित केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT