Jaydeep Apte: 'ठरलं होतं, तसं घडलं...' जयदीप आपटेला पोलिसांनी शोधलं नाही, तर... वाचा Inside Story
Jaydeep Apte arrest: जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली नाही तर तो स्वत:हून हजर झाला असा दावा आपटे याच्या वकिलांनी केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणी मुख्य आरोपी जयदीपा आपटेला अटक
जयदीप आपटेला कल्याणमधून करण्यात आली अटक
जयदीप आपटे स्वत:हून पोलिसांना शरण आल्याचा वकिलांचा दावा
Jaydeep Apte arrest inside story: कल्याण : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणातील मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटे याला काल रात्री (4 सप्टेंबर) मालवण पोलिसांनी कल्याणमधून अटक केली. तब्बल 10 दिवस फरार असलेला जयदीप आपटे हा काल कल्याणमध्ये त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेला असताना मालवण पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, आता या प्रकरणातील सगळ्यात मोठी माहिती समोर आली आहे. (chhatrapati shivaji maharaj statue collapse case sindhudurga jaydeep apte was not found by police but he surrendered to police inside story)
ADVERTISEMENT
तब्बल 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणारा जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली नाही तर तो स्वत: पोलिसांना शरण आल्याचं आता समोर येत आहे. आरोपी जयदीप आपटेचे वकील गणेश सोवनी यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. म्हणजे याचाच अर्थ आरोपी जयदीप आपटेला शोधण्यात पोलिसांना यश आलं नाही तर तो स्वत: पोलिसांना शरण गेला असल्याचं आता बोललं जात आहे.
हे ही वाचा>> Shivaji Maharaj Statue : मोठी बातमी! शिल्पकार जयदीप आपटेला 'इथून' केली अटक, नेमका कसा सापडला?
'आमचं ठरलं होतं, त्यानुसार घडलं...' आपटेच्या वकिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं
'पोलिसांनी अटक केली असं म्हणणं चुकीचं ठरेल. या सर्व प्रकरणात विचार केल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी न जाता त्याने स्वत:हून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं. त्याप्रमाणे त्याच्या कुटुंबीयांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की, त्याने पोलिसांना सरेंडर करायचं.'
हे वाचलं का?
'आज तो आला रे आला की, तो बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल. स्वत:ला सरेंडर करायची इच्छा दर्शवेल तो.. आणि पुढची न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होईल. असं आमचं आजच ठरलं होतं आणि त्यानुसार घडलंय.'
'ही जी काही चुकीची गोष्ट सांगितली जाते आहे की, तो काळोखात लपला होता, लपतछपत कुटुंबीयांना भेटायला जात होता हे सगळं खोटं आहे. तपास यंत्रणेशी सहकार्य करणं. जे काही त्यांच्यावर आरोप झाले आहेत ते निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायालयाला सामोरं जाणं हे आता आम्ही ठरवलं आहे.'
'मालवणला गेल्यानंतर त्याला आता मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हजर केल्यावर जो काही युक्तिवाद करायचा आहे तो केला जाईल.'
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवण पुतळा दुर्घटनेत पहिला आरोपी गजाआड, चौकशीतून नवीन माहिती समोर येणार?
'अत्यंत गुप्तता पाळली होती. कारण यामध्ये अत्यंत घाणेरडं राजकारण, गलिच्छ राजकारण झालेलं आहे. त्यावर काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. त्यामुळे याला आणखी फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेनं व्हावं हाच त्या मागचा हेतू होता.'
ADVERTISEMENT
'कोणतीही लपवाछपवी करायची नव्हती. त्यामुळे सर्व विचारांती कुटुंबीयांशी चर्चा करून त्याने सरेंडर करणं हा एकच उपाय आमच्यापुढे होता. त्याप्रमाणे आज सोपस्कार केले.'
'पक्षकाराशी झालेलं संभाषण कुठलाही वकील सांगत नाही. पण संपर्क झालेला होता एवढं नक्की?' अशी माहिती जयदीप आपटेच्या वकिलांनी दिली आहे.
कल्याणमध्ये नेमकं घडलं काय?
दुसरीकडे अशी माहिती समोर येत आहे की, जयदीप आपटे हा चेहऱ्यावर मास्क लावून आणि अंधाराचा फायदा घेत त्याच्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी कल्याण येथील राहत्या घरी आला होता. यावेळी त्याने पोलिसांना टाळण्याचाही प्रयत्न केला. मात्र तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस हवालदार तडवी, पोलीस हवालदार बागुल, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार शेळके यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी लागलीच आपटेला पकडलं आणि चौकशी सुरू केली. त्यावेळी तो जयदीप आपटेच असल्याचं समजलं.
ज्यानंतर पोलिसांनी जयदीप आपटे याला अटक केली. पोलिसांनी जयदीप आपटेविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. पुतळा कोसळल्यानंतर आपटे हा फरार झाला होता. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आल्याने पोलीस जयदीप आपटेसह सिंधुदुर्गकडे रवाना झाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT