3.30 वाजता योगा, नंतर... सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या फिटनेसचं काय आहे सिक्रेट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Vegetarian diet chief justice dy chandrachud
Vegetarian diet chief justice dy chandrachud
social share
google news

Chief Justice Chandrachud: सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज आयुष होलिस्टिक वेलनेस सेंटरचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी योगा (Yoga) आणि शाकाहारी आहार आपल्या जीवनशैलीत किती महत्वाचा आहे ते त्यांनी यावेळी सांगितले. 

योगा आणि शाकाहारी

यावेळी ते म्हणाले की, 'न्यायालयातील सहकाऱ्यांना कामा संबंधित तणावाचा सामना करण्यासाठी योगा आणि शाकाहारी जीवनशैली किती उपयोगी ते सांगत त्या जीवनशैलीचा अवलंब करा असंही त्यांनी यावेळी सांगितले.'

कुटुंबाचंही कल्याण


 सर्वोच्च न्यायालयात आयुष होलिस्टिक वेलनेस सेंटरचे उद्घाटन करताना सरन्यायाधीश  चंद्रचूड यांनी सांगितले की, या अशा पद्धतींचं महत्त्व फक्त केवळ न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीच उपयोगी नाही तर सर्वोच्च न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठीही हे उपयुक्त आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

योगाभ्यास महत्वाचा

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपला अनुभव सांगताना म्हणाले की, 'मी योगाभ्यास करतो. त्यामुळे मी आज योगा करण्यासाठी सकाळी 3:30 वाजता उठलो होतो. त्याच बरोबर गेल्या 5 महिन्यांपासून मी शाकाहारी आहार घेतो.

या पद्धतीचा माझ्या जीवनावर कसा परिणाम होईल यासाठी मी परिणाम करतो असंही त्यांनी यावेळी आपल्या प्रकृतीची गुरुकिल्ली सांगितली. 

ADVERTISEMENT

कामाचा प्रचंड ताण

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांवर येणारा ताण किती असतो ती गोष्टही त्यांनी यावेळी अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, सध्या 34 न्यायाधीशांचा समावेश आहे, ज्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असल्याचे हे त्यांच्या कामाच्या अनुभवातून त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

पंचकर्मही महत्वाचं

आपल्या कामाच्या ताणतणावाची गोष्ट सांगताना त्यांनी पंचकर्मचेही त्यांनी महत्व सांगितले. ते म्हणाले की, "मी एक वर्षापूर्वी पंचकर्म केले होते, मात्र आता पुन्हा त्यासाठी मी उत्सुक आहे. कारण आता त्याची गरज आहे. 

दैनंदिन कामाचा ताण

कारण सध्या आमच्याकडे सर्वोच्च न्यायालयात 2000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. सर्वोच्च न्यायालय, त्यातील माझ्या सहकाऱ्यांसह, सर्व 34 न्यायाधीश ते त्यांच्या दैनंदिन कामामुळेही प्रचंड ताणतणाव असतात.'

हे ही वाचा >> ॲमेझॉनमध्ये सापडला महाकाय Green Anaconda

    follow whatsapp

    ADVERTISEMENT