Manoj Jarange : “…तोपर्यंत जरांगे पाटलांनी थांबलं पाहिजे”, CM शिंदेंची विनंती
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आता मुंबईत उपोषण करणार आहेत. ते मुंबईत पोहोचण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय केलीये विनंती?
ADVERTISEMENT

Eknath Shinde Manoj Jarange Mumbai March : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अन्यथा कायम स्वरूपी टिकेल असं आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. या मागणीसाठी जरांगे आता मुंबईत उपोषण करणार आहे. त्यासाठी ते पायी मुंबईकडे येत आहेत. त्यांच्या पदयात्रेचा दुसरा दिवस असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना विनंती केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगेंची मागणी आणि मराठा आरक्षणावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
मनोज जरांगेंच्या पदयात्रेबद्दल मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मराठा समाजाबद्दल राज्य सरकार सकारात्मक आहे. जरांगे पाटील यांच्या ज्या ज्या सूचना आल्या, त्याप्रमाणे कुणबी दाखले देण्याचे काम सुरू आहे. हजारो-लाखो लोकांना कुणबी असल्याच्या नोंदी मिळत नव्हत्या, त्या लोकांना प्रमाणपत्र दिली गेली आहेत.”
हेही वाचा >> “…तर भाजपसोबत आम्ही तुम्हालाही गाडू”, आंबेडकर ‘मविआ’वर कडाडले
“तेलंगणा, हैदराबाद येथील जुने दस्ताऐवज आहेत. ते ऊर्दू, फारसी, मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्यासाठी लोक नियुक्त करण्यात आले आहेत. तेही काम वेगात सुरू आहे. शिंदे समिती काम करत आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.