Cyclone: 2 चक्रीवादळांचं संकट घोंगावतंय, मुंबईसह महाराष्ट्राला किती धोका?

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

crisis of 2 cyclones is looming how much danger to mumbai and maharashtra weather update
crisis of 2 cyclones is looming how much danger to mumbai and maharashtra weather update
social share
google news

Mumbai Cyclone: मुंबई: मान्सून (Monsoon) परतीच्या वाटेला लागला आहे. पण, त्याआधीच अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं. यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ (cyclone) तयार होत आहे. त्यापाठोपाठ बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. या दोन्ही चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर (Maharashtra) काय परिणाम होणार? मुंबई (Mumbai) आणि कोकण किनारपट्टीला किती धोका आहे? चक्रीवादळ कुठे धडकणार? हे सविस्तर जाणून घेऊया. (crisis of 2 cyclones is looming how much danger to mumbai and maharashtra weather update)

ADVERTISEMENT

जाणून घ्या चक्रीवादळाची नेमकी वाटचाल कशी आहे?

पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात अरबी समुद्राचं तापमान वाढतं. त्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असते. आता मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबरला दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप परिसरात चक्राकार वारे तयार झाले आहेत.

हे ही वाचा >> 5 कोटींचा Bed? एक रात्र झोपण्यासाठी 8 लाख रुपये भाडं, एवढं काय आहे या बेडमध्ये खास

18 ऑक्टोबरला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून पुढील 24 तासांत दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ मान्सूननंतरचं पहिलं चक्रीवादळ असेल. यानंतर पश्चिम ते उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाऊन 21 ऑक्टोबरला मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

सध्या हे चक्रीवादळ 20-30 किमी प्रतितास वेगानं पुढे सरकत आहे. पण, चक्रीवादळ कुठल्या दिशेने जाणार याची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे चक्रीवादळ कोणत्या किनारपट्टीला धडकणार हे सध्या सांगणं शक्य नाही. पण, या चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीत पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा >> कैद्यांना तुरुंगातच पार्टनरसोबत करता येणार रोमान्स? सरकारने कोर्टात काय दिली माहिती?

अरबी समुद्रासोबतच बंगालचा उपसागर आणि लगतच्या अंदमानजवळ 17 ऑक्टोबरला चक्राकार वारे तयार झाले. हे चक्राकार वारे पश्चिम-उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाऊन 20 ऑक्टोबरला कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल. त्यानंतर 24 ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ देखील कोणत्या दिशेने जाणार हे अद्याप स्पष्ट नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT