मुंबईजवळून जाणाऱ्या Biporjoy ने चुकवला काळजाचा ठोका, ऐनवेळी दिशाच बदलली..
बिपरजॉय हे वादळ मुंबईपासून आता पुढे सरकलं आहे. मात्र, या चक्रीवादळाची दिशा ही अद्यापही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे किनारपट्टीतील नागरिकांची चिंता कायम आहे.
ADVERTISEMENT
मुंबई: बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) जसजसे पुढे जात आहे तसतसे ते अधिक तीव्र होत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे केरळ आणि मुंबईच्या नजीकचा समुद्र बराच खवळला आहे. उधाणाच्या भरतीवेळी (High Tide) समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी जोरदार वारा वाहत असून पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (cyclone biporjoy mumbai sea changed the direction live tracker coast maharashtra gujarat monsooon)
ADVERTISEMENT
बिपरजॉय चक्रीवादळ हे सातत्याने आपली दिशा बदलत आहे. कधी ते पाकिस्तानच्या दिशेने पुढे सरकत आहे तर कधी ते गुजरातकडे वळताना दिसतंय. त्यामुळे हे वादळ नेमकं कुठे धडकणार हे अद्यापही निश्चित नाही. मात्र हे वादळ अतिशय वेगाने पुढे सरकत असल्याने गुजरातजवळील किनारपट्टी भागात प्रचंड वेगाने वारे वाहत असून समुद्र प्रचंड खवळला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ आणि मान्सून
काल (11 जून) रात्री मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्याच वेळी, समुद्राला देखील उधाणाची भरती देखील आहे. IMD च्या म्हणण्यानुसार, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरसह महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस झाला आहे. राज्याच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत आहेत. वादळाच्या वाढत्या हालचाली पाहता कांडला बंदर पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. तसेच या बंदरातील जहाजे ही सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आली आहेत.
हे वाचलं का?
मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉयच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्राच्या राजधानीसह राज्यातील अनेक शहरांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज (सोमवार) रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरमध्ये जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. हवामान खात्याने आज ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच बिपरजॉय या चक्रीवादळाचा प्रभाव हा केरळ, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून जाणार आहे. जे 15 जून रोजी पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीवर पोहोचू शकते. किनारी भागात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात सरकार किनारपट्टी भागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम तैनात करत आहे.
#WATCH | Maharashtra: High tidal waves witnessed in Mumbai as cyclone #Biparjoy intensified into a severe cyclonic storm.
(visuals from Gateway of India) pic.twitter.com/UrnR0sahtE
— ANI (@ANI) June 12, 2023
भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी माहिती दिली होती की, 15 जून रोजी दुपारी 125-130 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह चक्रीवादळ सौराष्ट्र-कच्छ आणि कराची किनारपट्टीवरून जाण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, केरळ, कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये आज म्हणजेच 12 जून रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. 12 जून ते 15 जून दरम्यान अंदमान आणि निकोबार बेट, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT