cyclone in arabian sea : चक्रीवादळ धडकणार, महाराष्ट्राला किती धोका?
मुंबई हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व अरबी समुद्रात मुंबईजवळ चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे.
ADVERTISEMENT
cyclone in arabian sea june 2023 : राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय तसेच मान्सून देखील लांबला आहे. अशातच अरबी समुद्रात नवं चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा कोणत्या भागाला फटका बसणार? कोणत्या भागात पाऊस पडणार? हेच समजून घेऊयात… (cyclone biporjoy latest news today)
ADVERTISEMENT
मुंबई हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व अरबी समुद्रात मुंबईजवळ (cyclone biparjoy in mumbai) चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे. ते पुढील ४८ तासांत उत्तरेकडे सरकून मुंबईजवळ अधिक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल… ७ जूनपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. 8-9 जूनदरम्यान हे चक्रीवादळ अधिक तीव्र होत जाईल. यावेळी वाऱ्याचा वेग 90 किमी प्रति तास इतका असू शकतो.
हेही वाचा >> ‘4 वर्षात 2 डझन आमदार झाले, पण मी पात्र नाही…’, पंकजा मुंडे आता खेळणार मोठा डाव
cyclone Latest News : चक्रीवादळ कुठे धडकणार?
हे चक्रीवादळ कुठं धडकणार? याबाबत अद्याप हवामान विभागानं माहिती दिलेली नाही. पण, मुंबईसह गुजरातच्या किनारपट्टीला या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे कोकणासह गुजरातमध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे मच्छिमारांना अलर्ट राहण्याचा इशाराही मुंबई हवामान विभागानं दिला आहे.
हे वाचलं का?
चक्रीवादळाचा मान्सूनला फटका बसणार?
महत्वाचं म्हणजे, या चक्रीवादळाचा मान्सूनवर काही परिणाम होईल का? तर केरळमध्ये ४ जूनला मान्सून दाखल होणार होता. पण, अद्यापही केरळात मान्सून दाखल झाला नाही. आणखी तीन ते चार दिवसांनी मान्सून केरळमध्ये येऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सून उशिरानं दाखल होण्याची शक्यता आहे. पण, अरबी समुद्रातल्या या चक्रीवादळामुळे मान्सून मुंबईत वेळेत दाखल होऊ शकतो, असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.
हेही वाचा >> काँग्रेस नेत्याचा गोपीनाथ मुंडेंनी ‘असा’ केलेला करेक्ट कार्यक्रम, तावडेंनी सांगितला भन्नाट किस्सा
5 June: राज्यात पुढील 2, 3 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
४, ५ दिवशी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
IMD@RMC_Mumbai @imdnagpur— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 5, 2023
ADVERTISEMENT
biporjoy cyclone update : बांगलादेशने दिले आहे नाव
प्रत्येक चक्रीवादळाला वेगवेगळी नावं दिली जातात. 2023 मधलं पहिलं चक्रीवादळ मे महिन्यात बंगालच्या उपसागरात तयार झालं होतं. या चक्रीवादळाचं नाव मोचा असं होतं. आता अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचं नाव बिपरजॉय असेल आणि हे नाव बांगलादेशनं दिलेलं आहे, अशी माहिती स्कायमेटनं दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT