Cyclone Michaung Updates : मिचॉन्ग चक्रीवादळ किनारपट्टीवर, महाराष्ट्राला किती धोका?

रोहिणी ठोंबरे

भारतीय किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ किनारपट्टीजवळ येताच चेन्नईच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

ADVERTISEMENT

Cyclone Michaung on the Indian coast how much of a threat to Maharashtra
Cyclone Michaung on the Indian coast how much of a threat to Maharashtra
social share
google news

Cyclone News : भारतीय किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. दक्षिण भारतातील (South India) अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचे कारण मिचॉन्ग वादळ (Michaung Cyclone) असल्याचे मानले जाते जे लवकरच चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते. (Cyclone Michaung on the Indian coast how much of a threat to Maharashtra)

या चक्रीवादळाबाबत हवामान खात्यानेही (meteorological department) अलर्ट जारी केला आहे. हे मिचॉन्ग आहे तरी काय?, त्याचे चक्रीवादळात रूपांतर कधी होईल? आणि देशातील कोणत्या राज्यांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

वाचा : Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना PM मोदींबद्दल असं काय बोलली की लोक करताहेत ट्रोल?

तामिळनाडूत बचाव कार्य

मिचॉन्ग चक्रीवादळ किनारपट्टीजवळ येताच चेन्नईच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. यासोबतच कांचीपुरममध्येही अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यानंतर एनडीआरएफच्या टीमने पीरकंकरनई आणि पेरुंगलाथूर जवळील तांबरम परिसरातून सुमारे 15 लोकांचा जीव वाचवला.
तामिळनाडूमध्ये धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त पाणी वाहत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव बेसिन ब्रिज आणि व्यासरपाडी दरम्यानचा पूल क्रमांक 14 थांबवण्यात आला आहे.

महाराष्ट्राला ‘मिचॉन्ग’ वादळाचा किती धोका?

हवामान खात्याच्या माहितीनुसार, चक्रीवादळ मिचॉन्ग 3 डिसेंबरच्या रात्री चेन्नईच्या 150 किमी पूर्व-आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य-पश्चिमेकडे केंद्रीत होते. 5 डिसेंबरच्या सकाळच्या वेळी नेल्लोर आणि मछलीपट्टनम (आंध्र प्रदेश) दरम्यान ते उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची, तीव्र शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा धोका आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp