Cyclone Update: ‘मिचॉन्ग’ चक्रीवादामुळे महाराष्ट्रावर संकट; IMD ने दिला इशारा

योगेश पांडे

ADVERTISEMENT

Cyclone Update Michaung impact On Maharashtra IMD Weather Forecast
Cyclone Update Michaung impact On Maharashtra IMD Weather Forecast
social share
google news

Michaung Cyclone Maharashtra Update : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाने (Michaung Cyclone) देशातील काही राज्यात हैदोस घातला आहे. त्यातच दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी आज महाराष्ट्रातील (Maharashtra) विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामान विभागाद्वारे देण्यात आला आहे. पुढील ४८ तास म्हणजेच 2 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Cyclone Update Michaung impact On Maharashtra IMD Weather Forecast)

ADVERTISEMENT

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (NRMD) दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याचे संचालक एम.एम. शाहू म्हणाले की, ‘मिचॉन्ग चक्रीवादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागातून जात असून, त्याचा परिणाम विदर्भातही दिसून येईल.’

वाचा : Raj Thackeray : “आपण पण वाहवत गेलो तर…”; जुना फोटो शेअर करत ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

हवामान विभागाच्या माहितीनुसार दोन दिवस पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता!

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवस म्हणजेच 6,7 डिसेंबर रोजी विदर्भात पावसाच्या सरी कोसळतील. त्यानंतर 9 डिसेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तसंच नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, लातूर भागांमध्येही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हे वाचलं का?

मिचॉन्ग चक्रीवादळ मध्य भारताकडे सरकत नाही, त्यामुळे त्याचा प्रभाव फारसा दिसणार नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून नागपूरमध्ये 7 डिसेंबरपर्यंत जोरदार पाऊस पडेल.

वाचा : NCP : ‘सिक्स पॅक अ‍ॅब्सवाल्या ‘दादां’ची…’, आव्हाडांनी अजित पवारांना फोटोच दाखवला

मिचॉन्ग चक्रीवादळाची सध्याची स्थिती काय?

मिचॉन्ग 5 डिसेंबरला संध्याकाळी 5.30 वाजता तीव्र स्वरूपात आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आदळलं आणि कमकुवत झालं. चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील बापटलापासून 25 किमी पश्चिम-वायव्येस आणि ओंगोलच्या 60 किमी उत्तर-ईशान्येस दक्षिण किनारपट्टी भागात धडकलं.

ADVERTISEMENT

वाचा : Kalyan Crime : पत्नीच्या डोक्यात घातला दांडा, नंतर…; रिक्षाचालकाच्या कृत्याने कल्याण हादरले

चक्रीवादळ वेगाने उत्तरेकडे सरकत असून पुढील काही तासात आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनार्‍यावरील तीव्र चक्रीवादळ मिचॉन्ग गेल्या 06 तासांत 10 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT