Dahi Handi: 'गोविंदा आला रे आला'; मुंबई-ठाण्यातील 'या' भागांमध्ये दहीहंडीचे लागणार सर्वात उंच थर!
Famous Dahi Handi in Mumbai Thane : आज (27 ऑगस्ट) दहीहंडीचा उत्सव ठिकठिकाणी जल्लोषात साजरा करण्यासाठी बालगोपाळ उत्साही आहेत. दरवर्षी मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
ADVERTISEMENT

Famous Dahi Handi in Mumbai Thane : आज (27 ऑगस्ट) दहीहंडीचा उत्सव ठिकठिकाणी जल्लोषात साजरा करण्यासाठी बालगोपाळ उत्साही आहेत. दरवर्षी मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी गोविंदाचे ग्रुप्स आणि आयोजक अनेक दिवसांपासून तयारी करत असतात. आज सकाळपासून मुंबई आणि ठाण्यातील रस्त्यांवर कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. 'गोविंदा आला रे आला'चा गजर गल्लीबोळात ऐकू येत आहे. दहीहंडी फोडण्यासाठी शहरातील विविध भागातील तरुणांचे ग्रुप्स निघणार आहेत. (Dahi Handi 2024 Govinda ala re ala The highest and famous Dahihandi groups in Mumbai-Thane know it)
दरवर्षीप्रमाणे यंदाही राजकीय पक्ष दहीहंडी उत्सवात उत्साहाने सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जन्माष्टमीच्या निमित्ताने मुंबई आणि ठाण्यात अनेक दशकांपासून साजऱ्या होणाऱ्या या लोकप्रिय उत्सवासाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. हा पुरस्कार सर्वात उंच थर लावणाऱ्या ग्रुपला दिला जातो.
हेही वाचा : Maharashtra weather: बाई... हा काय प्रकार? केवढा तो पाऊस, पुढील 48 तास राज्यासाठी धोक्याचे!
यंदा मुंबई-ठाण्यातील कोणत्या भागांमध्ये दहीहंडीचे उंच थर लागणार?
1) ठाणे - संस्कृती प्रतिष्ठान
आयोजक- आमदार प्रताप सरनाईक