Pune : दर्शना पवारची हत्याच! दोघे राजगडावर गेले, पण राहुल एकटाच परतला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Pune Crime News : big update in darshana pawar death case
Pune Crime News : big update in darshana pawar death case
social share
google news

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ मृतदेह आढळलेल्या दर्शना पवार हिच्या मृत्यूप्रकरणा वेगळे वळण लागले आहे. मित्रासोबत राजगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या दर्शनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. आता पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला असून, त्यात दर्शनाचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सध्या हत्येच्या संशयाची सुई तिच्या मित्राकडे असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी असलेली दर्शना पवार नुकतीच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. ती राज्यातून सहावी आली होती. दर्शनाची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणूनही निवड झाली होती.

हेही वाचा >> अहमदनगर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांना बाल्लेकिल्ल्यातच धक्का!

एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे तिचा पुण्यातील एका स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेणाऱ्या संस्थेकडून सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने दर्शना पवार ही 9 जून रोजी पुण्यात आली होती. सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरातील एका मैत्रिणीकडे ती राहत होती.

हे वाचलं का?

12 जून रोजी राजगडला गेली अन्…

दरम्यान, 12 जून रोजी दर्शना पवार ही आपण सिंहगड किल्ल्यावर जात असल्याचे मैत्रिणीला सांगून घराबाहेर पडली होती. दर्शनाने तिच्या कुटुंबीयांनाही याबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर ती राहुल दत्तात्रय हांडोरे या मित्रासोबत राजगड किल्ल्यावर फिरायला निघून गेली.

12 जून रोजी तिचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. तिच्या कुटुंबीयांनी तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही बाब समोर आली. त्यानंतर त्यांनी शोध घेतला. मात्र, ती कुठेही सापडली नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सिंहगड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

ADVERTISEMENT

दोघे गडावर गेले, पण एकटाच आला खाली

दर्शना ही तिचा मित्र राहुल हांडोरे सोबत मोटारसायकलवरून राजगड किल्ला बघायला गेले होते. 12 जून रोजीचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. यात दोघे सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोहोचले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> BMC: उद्धव ठाकरेंना घेरलं, ‘त्या’ प्रकरणी फडणवीसांकडून प्रचंड मोठी घोषणा

दोघांनी गड चढायला सुरूवात केली आणि वर गेले. त्यानंतर सकाळी दहा वाजता राहुल एकटाच गडावरून खाली आला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेल परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे कैद झाले आहे. त्यामुळे दर्शनाची हत्या तिच्या मित्रानेच केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या तो फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राहुल हा नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समजते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT