किम जोंग महिलांसमोरच ढसा ढसा रडला, भरसभेत नेमकं घडलं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

dictator of North Korea Kim Jong Un began to cry at the womens meeting
dictator of North Korea Kim Jong Un began to cry at the womens meeting
social share
google news

kim jing un : उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उन हा कडक आणि हुकूमशहा म्हणून त्याची जगात ओळक आहे. मात्र त्याचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. त्याचा तो व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला असला तरी त्याच्यावर विश्वास ठेवणे आता कठीण झाले आहे. किम जोंग उनचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये हुकूमशहा रडताना दिसत आहे आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. त्या व्हिडीओविषयी अशीही माहिती सांगितली जात आहे की, किम हा उत्तर कोरियाच्या (North Korea) महिलांना अधिक मुलं जन्माला घालण्याचे आवाहन करत होता आणि त्याचवेळी त्याला अश्रूही अनावर झाले होते.

ADVERTISEMENT

राष्ट्रशक्ती मजबूत करण्यासाठी

किम जोंग उन हा महिलांना आवाहन करत आहे कारण, उत्तर कोरियातील जन्मदर घटला आहे. त्या पार्श्वभूमीवर किम आपल्या देशातील महिलांना अधिक मुलं जन्माला घालण्याचे आवाहन करत होता. तो म्हणतो की, ‘राष्ट्रीय शक्ती’ मजबूत करण्यासाठी किमने उत्तर कोरियाच्या महिलांना अधिक मुलं जन्माला घालायला पाहिजे.

महिलांच्या कार्यक्रमामध्येच रडू कोसळलं

सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या व्हिडिओमध्ये किम जोंग उन राजधानी प्योंगयांगमधील महिलांच्या कार्यक्रमामध्येच रडताना दिसत आहे. त्याचवेळी ते पांढऱ्या रुमालाने डोळे पुसताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, किमने कार्यक्रमादरम्यान सांगितले की, ‘जन्मदरातील घसरण थांबवणे आणि मुलांची चांगली काळजी घेणे, त्यांना चांगले शिक्षण देणे या कौटुंबिक बाबी आहेत ज्या आपण आपल्या आईसोबत सोडवल्या पाहिजेत.’ एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार किमने कार्यक्रमामध्ये सांगितले की, ‘जन्मदरातील घसरण थांबवणे आणि मुलांची चांगली काळजी घेणे, त्यांना चांगले शिक्षण देणे याच खरं तर कौटुंबिक बाबी आहेत. त्या आपण आपल्या आईसोबतच सोडवल्या पाहिजेत असंही त्याने त्यामध्ये सांगितले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : अदाणींना विरोध… ठाकरे काँग्रेससोबत, पण राजकारण काय?

जन्मदर घसरला

सध्या उत्तर कोरियाचा जन्मदर प्रचंड कमी झाला असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. असंही सांगितले गेले आहे की, 2023 पर्यंत, उत्तर कोरियामध्ये सरासरी संख्या 1.8 होती. उत्तर कोरियासारखाच दक्षिण कोरियामधीलही जन्मदरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाचा प्रजनन दर हा जगात सर्वात कमी आहे. जन्मदर घसरण्याची मुख्य कारणं ही उच्च शाळेची फी, मुलांची काळजी घेण्यास असमर्थता आणि पुरुषकेंद्रित कॉर्पोरेट सोसायटी असल्याचे दिसून येते असंही सांगण्यात आले आहे.

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

लोकसंख्याही कमी

1970-1980 च्या दशकात आणि युद्ध झाल्यानंतर उत्तर कोरियाने लोकसंख्या वाढ कमी करण्यासाठी जन्म नियंत्रण कार्यक्रम लागू करण्यात आला. पण 1990 च्या मध्यात दुष्काळ पडला आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्या घटनेमुळेच उत्तर कोरियाची लोकसंख्याही कमी होऊ लागली, आणि ती आजतागायत सुरुच आहे.

जन्मदर वाढवण्यासाठी उपाय अनेक

उत्तर कोरियाने जन्मदर वाढवण्यासाठी अनेक उपाय योजले आहेत, ज्यात तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेल्या पालकांना विविध फायदे देण्याचा विचार केला. या लाभांतर्गत मुलांसाठी निवास, राज्याकडून अनुदान, मोफत भोजन, औषध, घरगुती वस्तू आणि शैक्षणिक सुविधांचा समावेश त्यामध्ये आहे. ह्युंदाई इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार उत्तर कोरियाची लोकसंख्या 2034 पर्यंत आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे 2070 पर्यंत उत्तर कोरियाची लोकसंख्या 23.7 दशलक्ष इतकी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा >> BJP MPs : केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या 10 खासदारांचे राजीनामे, पहा यादी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT