Dombivali : मोबाईल वापरू नको, अभ्यासात लक्ष दे म्हटल्याच्या रागातून मुलीची थेट खाडीत उडी, पोलिसांनी...

मुंबई तक

डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर परिसरात ही मुलगी आई-वडिलांसोबत राहत होती. मुलीचे वडील भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी 5 डिसेंबर रोजी दुपारी ही घटना घडली

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आई रागावल्याचा मुलीला राग आला...

point

मुलीने थेट घरून निघत गाठली खाडी

डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केली. मोबाईल वापरू नको, अभ्यासात लक्ष असं म्हणत आई रागावल्यामुळे मुलीने डोंबिवलीतील माणकोली पुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्या केली. दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह रविवारी सायंकाळी खाडीजवळ आढळून आल्यानं हा प्रकार उघडकीस आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर परिसरात ही मुलगी आई-वडिलांसोबत राहत होती. मुलीचे वडील भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी 5 डिसेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. तरुणी सतत मोबाईल फोन वापरत होती. यावेळी तिच्या आईने तिला मोबाईल फोनकडे जास्त लक्ष देऊ नको,  अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असं सांगितलं.

 

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : "तुम्ही मला उठ आणि बस सांगणार असाल तर...", छगन भुजबळ संतापले, तुफान बरसले

 

हे वाचलं का?

    follow whatsapp