LPG Price Cut: घरगुती गॅस सिलेंडर 200 रूपयांनी स्वस्त होणार

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

domestic lpg cylinder price reduced by rupees 200 government announced subsidy on rakshabandhan festival
domestic lpg cylinder price reduced by rupees 200 government announced subsidy on rakshabandhan festival
social share
google news

देशात महागाई प्रचंड वाढली आहे. या महागाईने जनता त्रस्त असतानाच आता रक्षाबंधनाच्या शुभमुहुर्तावर घरगूती गॅस  संदर्भात केंद्र सरकारने (central Government) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घरगूती गॅसच्या दरात 200 रुपयांपर्यंत कपात केली आहे. याचसोबत घरगुती गॅस सिलिंडरवर सरकारने 200 रुपये सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.(domestic lpg cylender price reduced by rupees 200 government announced subsidy on rakshabandhan festival)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला. या बैठकीत उज्ज्वला योजनेंतर्गत (Ujjwala Yojana) घरगूती गॅसच्या किंमतीत 200 रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी स्वस्त होतील.

दरम्यान ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात केली होती. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. त्यामुळे आता घरगुती गॅसच्या दरातही कपात करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : मुंबई Tak Exclusive: DHFL चे मालक Wadhawan बंधूंचा कैदेत राजेशाही थाट, गृह खात्याला हादरवणारा रिपोर्ट

गॅसचे दर काय?

ऑगस्टमध्ये दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये होती. त्याच वेळी, एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 1102.50 रुपये, कोलकातामध्ये 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.50 रुपये होती.

केंद्र सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. या अंतर्गत सरकार दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना LPG कनेक्शन मोफत देते.
या योजनेत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळतो. मार्च 2023 पर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत 9 कोटीहून अधिक मोफत स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनचे वितरण केले होते. उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी एका वर्षात एकूण 12 स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सबसिडी घेऊ शकतात. उज्ज्वला योजनेंतर्गत, सरकार आधीपासून 200 रुपये अनुदान देत होते, आता 200 रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे.त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : What is Lagrange Point: सूर्याच्या उष्णतेने Aditya-L1 भस्म होणार नाही?, ISRO च्या तज्ज्ञांची भन्नाट शक्कल!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT