‘डेट’वर जाताय? तर ‘या’ चुका टाळाच, नाही तर आयुष्यभर राहाल ‘सिंगल’
सध्याच्या काळातील नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्यासाठी कोणत्याही गोष्टी कारणीभूत ठरु शकतात. त्यामुळे डेटिंगचा विचार करत असाल तर खूप छोट्या छोट्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर नातेसंबंध तयार होण्याआधीच ते संपून जाऊ शकतात.
ADVERTISEMENT
Dating Mistakes: सध्याच्या काळात डेटिंगवर जाणं सोपं असलं तरी ते खूप कठीण झाले आहे. धावपळीच्या युगाचा परिणाम अशा अनेक नात्यांवरही (Relationship) दिसून येऊ लागला आहे. सततची धावपळ आणि ताण तणावची जीवनशैलीमुळे (Lifestyle) रोमँटिकपणाही (Romantic) कमी झाला आहे. रोमँटिकपणा कमी झाला तर आहेच मात्र त्याची पद्धतही बदलली आहे. सध्याच्या काळातील लोकांना फक्त प्रेम (Love) करणारा जोडीदार (Life Partner) नको आहे तर तो अनेक बाबतीत परफेक्ट लागत असतो. त्यातच सोशल मीडियाची (Social Media) गोष्ट करत असाल तर मात्र त्याची गोष्टच वेगळी झाली आहे.
ADVERTISEMENT
विश्वासाचे नाते
ज्यावेळी नव्या नातेसंबंधाला सुरुवात झालेली असते त्यावेळी माणसं निश्चितच त्याबाबत खूप उत्सुकही आणि चिंताग्रस्तही असतात. त्याचवेळी तुम्हाला तुमच्या समोरच्या व्यक्तीच्या सवयीही समजून घ्यायच्या असतात. कारण याचवेळी दोघांमधील नात्यासंबंधामध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण झालेले असते. मात्र नातेसंबंधाच्या सुरुवातीलाच काही लोकं चुका करतात आणि नात्यातील रोमँटिकपणाही घालवून बसतात. त्यामुळे काही चुका या टाळाव्याच लागतात.
आर्थिक ठोकताळे
डेटिंगच्या प्रारंभीच्या काळात अनेक लोकं अतिविचार करत असतात. मात्र त्या विचारांचा काही फायदा होत नसतोच. मात्र या सवयीमुळे तुम्ही चिंताग्रस्त होत असता. नाते सुरु होण्याआधीच भविष्यातील ठोकताळे बांधले गेल्यामुळे नात्यातील रोमँटिकपणा नाहीसा होतो.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Thane: सासूला जनावरासारखं मारलं, सुनेचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल चीड!
‘या’ गोष्टी टाळा
डेटिंगला प्रारंभ झाल्यानंतर काही माणसं शारीरिक संबंधासाठी पुढाकार घेतात. मात्र ही गोष्ट डेटिंगसाठी चांगली मानली जात नाही. त्यामुळे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले तरी तुमच्यामधील भावनिक नातेसंबंध दूर गेलेले असतात. त्यामुळे काही वेळा नात्यालाही पूर्णविराम मिळत असतो.
संशय कल्लोळ
तुम्ही जर डेटिंग करत असाल तर आपल्या पार्टनरची चौकशी करणे, त्याच्यावर संशय घेणे या गोष्टी नात्याला मारक ठरतात. त्यामुळे नात्याला सुरुवात होण्याआधीच ते संपून जाते.
ADVERTISEMENT
अपेक्षा ठेवणं चुकीचं
डेटिंगला प्रारंभ केल्यावर त्यामध्ये आधी नातेसंबंध जपणे, ते वाढवणे गरजेचे असते. डेटिंगनंतर तुम्ही लगेच कोणाचाही जोडीदार बनू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही त्या नात्यामध्ये अपेक्षा ठेवणे, त्याच्यावर किंवा तिच्यावर दबाव आणणे हे खरं तर डेटिंगसाठी धोकादायक ठरु शकणारे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Dussehra Melava: अंगार-भंगारवरुन कोण भिडलं, संजय राऊत का संतापले?
मेसेजचा अतिरेक नको
डेटिंगवर असताना एकमेकांशी खूप बोलणे आणि रोज बोलणे होत असते. मात्र हे असले तरी अति मेसेज केल्यामुळेही तुमच्या नात्यामध्ये नाराजी व्यक्त केली जाऊ शकते. त्यामुळे सातत्याने मेसेज पाठवण्यापेक्षा एकमेकाबरोबर वेळ घालवणे महत्वाचे आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT