Electoral Bond Data: कोणत्या पक्षाला किती इलेक्टोरल बॉड मिळाले? SBI ची संपूर्ण लिस्ट

मुंबई तक

Electoral Bond Data: निवडणूक रोख्याच्या माध्यमातून भाजपला सर्वाधिक 2 हजार 123 कोटी रूपयांची देणगी मिळाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला देणगी मिळाली आहे.

ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्टोरल बाँड्सचा तपशीलवार  निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला आहे.
electoral bond, sbi data, election commision
social share
google news

Electoral Bond Data:  सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्टोरल बाँड्सचा तपशीलवार निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला आहे. यानंतर निवडणूक आयोगाने हा डेटा आपल्या अधिकृत वेबसाईटवरही अपलोड केला आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाला बाँडद्वारे किती देणगी मिळाली आहे? हे जाणून घेऊयात.  (electoral bond full data who bought electoral bonds which party encashed thes compelte sbi data) 

एसबीयआने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक रोख्याच्या माध्यमातून भाजपला सर्वाधिक 2 हजार 123 कोटी रूपयांची देणगी मिळाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला देणगी मिळाली आहे. तृणमुलला 1 हजार 198 कोटी देणगी मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला 615 कोटी रूपये देणगी मिळाली आहे.

हे ही वाचा: काँग्रेसची महाराष्ट्रातील यादी जाहीर, 'यांना' तिकीट!

भाजपचे देणगीदार कोण? 

  • मेघा इंजिनियरने 584 कोटी 
  • क्लिव सप्लाय चैन 375 कोटी
  • भारती एअरटेल 197 कोटी
  • मदनलाल 176 कोटी
  • केवेंटर फुडपार्क इन्फ्रा 145 कोटी
  • डिएलएफ डेव्हलपर 130 कोटी
  • बिरला कार्बेन इंडिया  105 करोड 
  • वेदांता 355 कोटी 

असे सगळे देणगीदार मिळुन भाजपला निवडणूक रोख्याच्या माध्यमातून 2 हजार 123 कोटी देणगी मिळते.

तृणमुलचे देणगीदार कोण?

  • हल्दीया एनर्जी, 362 करोड
  • फ्युचर गेमिंग हॉटेल सर्विस 692 करोड
  • धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर 90 करोड 
  • चेन्नई ग्रीन वुड  40 करोड 

तृणमुल काँग्रेसला या देणगीदारांच्या माध्यमातून 1 हजार 198 करोड रूपये देणगी स्वरूपात मिळतात. 

हे वाचलं का?

    follow whatsapp