Ganesh Visarjan 2024: बाप्पाचं विसर्जन घरीच करताय? मग थोडं थांबा...
Ganesh Visarjan 2024 : अनेकजण घरीच लाडक्या बाप्पाचे जल्लोषात विसर्जन करतात. अशावेळी घरी विसर्जन करण्याची योग्य पद्धत काहींना माहिती नसते. त्यामुळे योग्य पद्धत नेमकी काय? जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गणेश विसर्जनाची योग्य पद्धत नेमकी काय?
घरीच गणेशमूर्तीचे विसर्जन कसे करावे?
गणेश विसर्जन मंत्र
Ganesh Visarjan 2024 : सध्या नागरिकांचा कल इकोफ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्याकडे वळत आहे. पर्यावरणाची सुरक्षा लक्षात घेता लोक शाडूच्या मातीने बनवलेली बाप्पाची मूर्ती खरेदी करत आहेत. त्यामुळे अनेकजण घरीच लाडक्या बाप्पाचे जल्लोषात विसर्जन करतात. अशावेळी घरी विसर्जन करण्याची योग्य पद्धत काहींना माहिती नसते. त्यामुळे घरी होणाऱ्या विसर्जनाची योग्य पद्धत नेमकी कशी आहे? आज आपण सविस्त जाणून घेऊयात. (Ganesh visarjan 2024 Anant chaturdashi How to perform Ganesh Visarjan at Home know it)
भाद्रपद महिन्यातील गणेश चुतर्थीला घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते. 10 दिवस बाप्पाचे थाटात मानपान करण्यात येते. यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे. तर अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर रोजी आहे.
हेही वाचा : बिग बॉसचा आदेश अन् आर्या घराबाहेर! पण, चाहत्यांचा मिळतोय फुल्ल सपोर्ट; करणार का पुन्हा एन्ट्री?
गणेश विसर्जनाची योग्य पद्धत नेमकी काय?
- श्रीगणेशाची विधिवत पूजा केल्यानंतर हवन करा आणि नंतर गणेशाचे स्वस्तिवाचन करा.
- आता पाट घ्या आणि त्यावर स्वस्तिक बनवा. नंतर तो तसाच ठेवावा, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे कापड त्यावर पसरून चारही कोपऱ्यात पूजेसाठी सुपारी ठेवावी.
- आता मूर्ती जिथे ठेवली होती तिथून उचला आणि आनंदाच्या जयघोषात यावर बसवा.
- आत गणपती बाप्पासमोर फळे, फुले, सुपारी आणि मोदक ठेवा.
- यानंतर हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करा.
- पूजेच्या 10 दिवसात काही चूक झाली असेल तर माफी मागा.
- आता सर्वांनी गणपती बाप्पाचं नाव घेत बाप्पाला डोक्यावर किंवा खांद्यावर पाटासह विसर्जनस्थळी घेऊन जल्लोषात घरातून निरोप घ्यावा.
- विसर्जनाच्या ठिकाणी लक्षात ठेवा की बाप्पाची मूर्ती फेकून देऊ नये, तर पूर्ण आदराने विसर्जन करावे.
- यानंतर हात जोडून माफी मागून पुढच्या वर्षी येण्याची विनंती करा.
- विसर्जनाच्या वेळी कापूर लावून बाप्पाची आरती करावी.
घरीच गणेशमूर्तीचे विसर्जन कसे करावे?
- जर तुम्ही घरातच विसर्जन करत असाल तर वर दिलेल्या संपूर्ण प्रक्रियेचे अनुसरण करा.
- निर्माल्य एकाच ठिकाणी गोळा करून योग्य ठिकाणी विसर्जित करावे.
- घरात विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातील कुंडीत किंवा बागेत पाणी आणि माती विसर्जित करावी.
हेही वाचा : Gold Price: सोन्याचा विषयच हार्ड! किंमत बघूनच म्हणाल बाईईई हा काय प्रकार? जाणून घ्या आजचा भाव...
श्री गणेश विसर्जन मंत्र 1
यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
श्री गणेश विसर्जन मंत्र 2
गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर।
मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT