Ganpati 2023: मीरा रोडचा महाराजा अन् एक वेगळाच उपक्रम…

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Sankashti Chaturthi: 2023 वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त-पूजा विधी
Sankashti Chaturthi: 2023 वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त-पूजा विधी
social share
google news

Ganeshostav 2023 cyber crime Awareness: मीरा रोड: मीरा रोड येथील मीरा रोडचा महाराजा (Mira Roadcha Maharaja) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (Ganeshostav Mandal) सेक्टर 9 शांती नगर हे दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. हा मंडळ सामाजिक कार्यक्रमासोबत शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा दर गणेशोत्सव काळात कार्य करत असतात. मीरा रोडचा महाराजा या मंडळाची स्थापना सन 1991 रोजी झाली असून यावर्षी ते 33 वा गणेशोत्सव साजरा करत आहेत. (ganeshostav 2023 cyber crime awareness program was organized by mira roadcha maharaja ganapati mandal)

या मंडळाचे कार्यकर्ते त्यांचे मार्गदर्शक चंद्रकांत वैती, अध्यक्ष मिलिंद मिराशी आणि उपाध्यक्ष संतोष परब यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नवीन कार्यक्रम आयोजित करत असतात. मागच्या वर्षी त्यांनी रोबोटिक्स विषयावर 200 हून अधिक मुलांना रोबोट कसे बनवायचे याबाबत माहिती दिली होती.

गणपती मंडळाचा अनोखा उपक्रम…

यंदा मीरा रोडचा महाराजा यांनी एक अनोखा व नवीन उपक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये त्यांनी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राईम जनजागृती (Cyber Crime Awareness) कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> मुंबई Tak चावडी: ‘…तर त्या माणसाला आयुष्यातून उठवायचं?’, ‘मनातील मुख्यमंत्री’वरुन पंकजा मुंडेंचा कोणावर निशाणा?

सदर कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश शंकर माने-पाटील, नया नगर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे, सायबर क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, प्रसाद शेनोळकर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांना सायबर क्राईम रोखण्यासाठी विविध प्रकारच्या आवश्यक उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली.

मीरा रोडचा महाराजा मंडळाने इतर सर्व गणपती मंडळासमोर एक आदर्श उभा करत इतर सर्व गणपती मंडळाने सुद्धा सायबर क्राईम तसेच विविध प्रकारच्या गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करावे असे आवाहनही केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT