Sharad Mohol : पुणे हादरलं! कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची भरदुपारी हत्या
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर हा जीवघेणा हल्ला टोळीने केला की हल्लेखोर अन्य कुणी होते, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
ADVERTISEMENT
Who is sharad mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ यांना लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू झाला. आज (५ डिसेंबर) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
ADVERTISEMENT
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर हा जीवघेणा हल्ला टोळीने केला की हल्लेखोर अन्य कुणी होते, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
हेही वाचा >> हाजी मलंग दर्गा की मंदिर?, राजकारण का तापले? नेमका त्याचा इतिहास काय?
शरद मोहोळ कोथरूड परिसरातील सुतारदरा भागातून जात होता. त्यावेळी अचानक दुचाकीवरून काही जण आले. त्यांनी शरद मोहोळ याच्या जवळ जाऊन अचानक गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या चुकल्या मात्र, एक गोळी त्याच्या खांद्याला लागली.
हे वाचलं का?
या घटनेत जखमी झालेल्या शरद मोहोळला तातडीने कोथरूड परिसरातच असलेल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
कोण आहे शरद मोहोळ?
शरद मोहोळ हा गँगस्टर म्हणून कुख्यात होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. विरोधी टोळीतील पिंटू मारणे याच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केले होते. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. या कालावधीत येरवडा कारागृहात त्याने आणि विवेक भालेराव या दोघांनी मिळून दशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला होता.
ADVERTISEMENT
या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला होता. मात्र बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा गुन्हेगारी कृत्य सुरु केलं. खंडणीसाठी धमकावल्याबद्दल त्याच्यावर पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
हेही वाचा >> ठाकरेंना 18, पवारांना 6 जागा; काँग्रेसने ठरवला ‘मविआ’चा फॉर्म्युला
त्यानंतर जुलै 2022 मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं. मधल्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आणि पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळ पत्नीच्या स्वाती मोहोळच्या माध्यमातून राजकारणात उतरला आहे. शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचे कार्यक्षेत्र कोथरूड परिसरात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT