तरुणीचा फ्लाइंग Kiss, Dhirendra Shastri म्हणाले; तुमच्यामुळेच तर…

ADVERTISEMENT

girl gave flying kiss to Dhirendra Krishna Shastri prefect of Bageshwar Dham divya darbar
girl gave flying kiss to Dhirendra Krishna Shastri prefect of Bageshwar Dham divya darbar
social share
google news

Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांच्या वक्तव्यामुळे आणि दिव्य दरबारामुळे (Divya Darbar) नेहमीच चर्चेत राहतात. नुकतेच त्यांनी छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) झालेल्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर आलेल्या एका मुलीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण हजारोंच्या लोकांसमोर तिने धीरेंद्र शास्त्री यांना फ्लाइंग किस (Flying Kiss) दिला आहे. ते दृश्य पाहून शास्त्रींही लाजले होते. ही संपूर्ण घटना आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सौंदर्यामुळं ट्रोल

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘दिव्य दरबार’मध्ये एक युवती आली होती, त्यावेळी तिने माईकद्वारे त्यांच्याशी संवाद साधत होती. त्यावेळी तिने त्यांना सांगितले की, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. आणि तुम्ही मला नेहमीच गोंडस दिसता आणि तुम्ही इतके कसे काय सुंदर आहात असा सवालही तिने केला आहे.
त्या तरुणीच्या सवालानंतर धीरेंद्र शास्त्रींनीही डोक्यावर हात मारत आश्चर्य व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, या माझ्या सौंदर्यांमुळे सध्या मी खूप ट्रोल होते आहे. तसेच त्याच विषयावरून माझं दररोज एक लग्नही लागत आहे, असं सांगत त्यांनी तिला म्हटले आहे की, इसलिए बहन जी आजकल हमने श्रृंगार करना ही बंद कर दिया है.

थँक्यू सिस्टर

दिव्य दरबारामध्ये आलेल्या ती तरुणीने गुडघ्यावर बसत त्यांना ती म्हणते की, तुम्ही मेकअप न करताह इतके कसं काय सुंदर दिसता. हे ती सांगत असतानाच तिने दोन्ही हातांनी त्यांना फ्लाइंग किस दिला आहे. मात्र तिच्या या प्रतिक्रियेनंतर धीरेंद्र शास्त्रींनी मात्र ‘थँक यू सिस्टर, थँक्स माय डियर सिस्टर म्हटले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Shiv Sena UBT: ठाकरेंच्या Shiv Sena शहरप्रमुखाचा कोथळाच काढला, हत्येने खळबळ

लग्नासाठी मला धमकी

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले होते की, काही मुलींना त्यांना धमकी दिली होती की, जर तुम्ही लग्नाची मिरवणूक घेऊन नाही आला तर आम्ही आम्ही आत्महत्या करू असंही मला सांगितलं जाते. हे प्रसंग त्यांनी अगदी हसत खेळत त्यांनी सांगितले. यावर त्यांनी एक व्हिडीओ करून तो पोस्टही केला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की, माझे गुरु आणि आई वडिलांनी सांगितले की, मी माझं लग्न करणार आहे. मात्र त्यांनी काळ आणि वेळ मात्र सांगितले नाही.

लवकरच विवाहबंधनात

बागेश्वर धामचे पीताधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यानी आपल्या आईलाही मुलगी शोधण्यास सांगितल्याची चर्चा आहे. त्यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना सांगितली.

ADVERTISEMENT

अंनिसचे जाहीर आव्हान

धीरेंद्र शास्त्री यांचे पूर्ण नाव धीरेंद्र कृष्ण शास्त्री असून ते मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम सरकार मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. जे बागेश्वर धाम महाराज या नावाने प्रसिद्ध आहेत. धीरेंद्र यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी छतरपूर जिल्ह्यातील गधा गावात झाला. धीरेंद्र हा अगदी सामान्य कुटुंबातील आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षणही अगदी सरकारी शाळेत झाले. अंधश्रद्धा निर्मलन समितीने त्यांना चमत्कारिकतेचे प्रदर्शन करण्यास सांगितले होते, मात्र त्या कार्यक्रमात ते सहभागी झाले नव्हते. धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूरचे श्याम मानव यांनी त्यांना आव्हान दिले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Manoj जरांगेंच्या ‘त्या’ मागणीनंतर छगन भुजबळ आक्रमक, सरकारला थेट दिली धमकी!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT