Gold Price Today: सोन्याचे भाव स्थिरावले! खरेदीआधी एका क्लिकवर तपासा आजचे दर...
Gold-Silver Price Today : भारतात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. आता सणासुदीत तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोनं प्रचंड महागलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते.

जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर...

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
Gold-Silver Price Today : भारतात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईत नागरिक सोने खरेदी करतात. आता सणासुदीत तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोनं प्रचंड महागलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पण, कालच्या तुलनेत आज (9 सप्टेंबर 2024) सोन्याचे दर सारखेच असून स्थिरावल्याचे पाहायला मिळत आहे. चला जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर...
Goodreturns वेबसाईटनुसार, रविवारी (8 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 72, 870 रूपये होता. आजही हा भाव कायम आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,800 रूपये आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीमध्ये 500 रूपयांनी वाढ झाली असून 85,000 रूपये किंमत झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हेही वाचा : Big Boss Marathi 5: जान्हवीमुळे झालं 3568 रुपयांचं नुकसान! चाहत्याने केली पैशांची मागणी; नेमकं घडलं काय?
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,800 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,870 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,660 रूपये आहे.
पुणे