Big Boss Marathi 5: जान्हवीमुळे झालं 3568 रुपयांचं नुकसान! चाहत्याने केली पैशांची मागणी; नेमकं घडलं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा 5वा सीझन सध्या प्रचंड चर्चेत आहे. रोज नवनवीन राडा-धिंगाणे हे घरात होतच असतात. पण, याचे निकाल थेट भाऊच्या धक्क्यावर लागतात. अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची या शोमध्ये अनेकांबरोबर भांडणं पाहायला मिळाली. वर्षा उसगांवकर यांचा अपमान केल्याने तिच्यावर टीका झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिने पंढरीनाथ कांबळेलाही करिअरवरून सुनावलं होतं, त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. (bigg boss marathi season 5 bhaucha dhakka a fan of janhavi killekar demand to give him his 3568 rupees)

यासाठी जान्हवीला बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुखकडून खूप बोलणी ऐकावी लागली होती. तर, आठवड्याभरासाठी जेलमध्येही राहावे लागलेले. पण या आठवड्यात तिने स्वत:मध्ये बदल केल्याचं पाहायला मिळालं. यासाठी तिचं घरच्यांनीही कौतुक केलं. अशातच आता भाऊच्या धक्क्यावर कलाकारांना सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल येणाऱ्या कमेंट वाचायला देण्यात आल्या आहेत. जान्हवीसाठीची आलेली कमेंट सध्या खूप व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : Maharashtra Weather: बाई... काय खरं नाही! महाराष्ट्रावर मोठं संकट, IMD चा महत्त्वाचा इशारा 

जान्हवी तिला आलेली कमेंट वाचतेय की, 'जान्हवी बाहेर आल्या आल्या मला तुमचा नंबर द्या. कारण तुमच्यामुळे माझं ३५६८ रुपयांचं नुकसान झालं आहे. मी नवीन काचेचा डिनर सेट घेतला होता. तो बायको हातात घेऊन उभी होती आणि त्याचवेळी तुम्ही घनश्यामवर ओरडला. त्यामुळे ती दचकली आणि तिच्या हातातला तो डिनर सेट पडला आणि फुटला. या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात. तेव्हा प्लीज प्लीज माझे ३५६८ रुपये देऊन द्या.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावर जान्हवीसह घरातल्या सर्वांनाच हसू अनावर झाले. रितेश देशमुखनेही जान्हवीची मस्करी केली.


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT