Maharashtra Weather: बाई... काय खरं नाही! महाराष्ट्रावर मोठं संकट, IMD चा महत्त्वाचा इशारा 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे

point

विजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्यांचा पाऊस होण्याचा अंदाज

point

'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज!

Maharashtra Weather Update : सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला असून मागील तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गणेशोत्सवात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. आज (९ सप्टेंबर 2024) हवामान विभागाने काही जिल्ह्यांना महत्त्वाचा इशाराही दिलेला आहे.  विजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्यांचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात... (maharashtra weather update imd alert weather report today 9 september 2024 mumbai pune kokan)

महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता अधिक तीव्र झाला आहे, याचा परिणाम राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासांत होऊ शकतो. यामुळे IMD ने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : Surat : गणेशोत्सवाला गालबोट! गणपती मंडळावर दगडफेकीनंतर गाड्यांची तोडफोड-जाळपोळ; रात्रभर तुफान राडा

IMD च्या अंदाजानुसार आज कोकणात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Manoj Jarange: मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकणार? छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीत काय चर्चा झाली?

'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज!

आज कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहे. त्याचबरोबर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT