भर मंडपात प्रेम आलं उफाळून,नवरदेवाने मेहुणीसोबतच उरकला लग्नाचा कार्यक्रम!

मुंबई तक

ADVERTISEMENT

groom wedding ceremony with his sister-in-law in bihar
groom wedding ceremony with his sister-in-law in bihar
social share
google news

Groom’s wedding ceremony with his sister-in-law : देशभरात लग्नसराई सुरू आहे. जागोजागी ढोल-नगाडे वाजतायत,वराती निघतायत. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात अडकतायत. या सर्वात एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या घटनेत नवरदेव लग्न जमलेल्या नवरीसाठी वरात घेऊन गेला होता,मात्र परतताना तो मेहूणीसोबत लग्न करून आला.त्यामुळे नेमकं नवऱ्यासोबत असं काय घडलं की त्याला अचानक मेहूणीशी लग्न करावं लागलं होतं? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. (groom wedding ceremony with his sister-in-law bihar saran story)

ADVERTISEMENT

भंभौली गावात राहणाऱ्या रामू बीन यांची कन्या रिंकू कुमारीचे लग्न छपराच्या रतनपुरा बिनटोलीत राहणाऱ्या स्वर्गीय जगमोहन महतो यांचा पुत्र राजेश कुमार सोबत 2 मे रोजी जमलं होते. 2 मेला नवरदेव राजेश कुमार बॅंड बाजा बारात घेऊन रिंकू कुमारीच्या घरी आला होता.यावेळी नवरीकडच्यांनी वरातीचे स्वागत केले होते. त्यानंतर लग्नाच्या अनेक विधी पार पडल्या. या सर्व विधीनंतर रिंकू आणि राजेशने एकमेकांना हार घातला होता.

हे ही वाचा : शारीरिक संबंध ठेवून…महिला पोलीसच करायची भयंकर कृत्य

नरदेवाला मेहूणीची धमकी

लग्नाच्या अर्ध्या विधी उरकल्या असताना नवरदेव राजेश कुमारला अचानक त्याचा मेहूणीचा कॉल आला होता. या कॉलवर मेहूणीने नवरदेवाला धमकी दिली. जर तू माझ्या बहिणीशी लग्न केलेस तर टेरसवरून उडी मारून मी आत्महत्या करेन. या धमकीनंतर लग्नातील वातावरण चांगलेच तापले. यानंतर दोन्ही पक्षात या घटनेवरून मोठी वादावादी झाली होती.

हे वाचलं का?

दरम्यान लग्नमंडपातील हसतं खेळतं वातावरण या एका घटनेने पुर्णंत बदललं होतं. वाद वाढताना पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाद शमवला. त्यानंतर नवरदेवाचे लग्न नवरीशी लावण्याऐवजी तिच्या मेहूणीशी लावून देण्यात आले होते.

हे ही वाचा : सुनेचे दोन तरुणांसोबत सुरु होते शरीरसंबंध, सासूने दरवाजाला लावला टाळा अन्…

नरदेव होता मेहूणीच्या प्रेमात

विशेष म्हणजे या घटनेत नवरदेव राजेश कुमार आणि नवरीची बहीणीचे एकमेकांवर प्रेम करायचे. ज्यावेळेपासून बहिणीचे लग्न राजेश कुमार सोबत जमले होते, त्यावेळेपासुन ही लव्हस्टोरी सुरु झाली होती. त्यामुळे लग्न होण्याअगोदर दोघेही अनेकदा भेटायचे, फोनवर तासंनतास बोलत असायचे. त्यामुळे राजेश बहिणीशी जमलेले लग्न तिला मान्य नव्हते.त्यामुळे तिने कॉल करून राजेशला आत्महत्येची धमकी दिली होती. या धमकीने राजेश घाबरला होता आणि त्याने संपूर्ण लव्हस्टोरी कुटूंबियांना सांगितली होती. त्यानंतर जाऊन मग नवरदेव आणि मेहूणीचे लग्न लावण्यात आले होते.बिहारच्या सारण जिल्ह्यात ही घटना घडलीय. या घटनेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT