Hindenburg Report : भारतात खळबळ! "सेबी अध्यक्षांच्या परदेशात बनावट कंपन्या; अदाणी समूहाशी संबंध"

मुंबई तक

ADVERTISEMENT

अदाणी समूह आणि सेबी अध्यक्ष माधबी पुरी बुच यांच्यात संबंध असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे.
हिंडनबर्ग रिसर्चने सेबी अध्यक्ष माधवी पुरी पुच आणि धवल बुच यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये सेबी अध्यक्षांवर गंभीर आरोप

point

माधवी पुरी बुच आणि अदाणी समूहाचे संबंध असल्याचा आरोप

point

हिंडनबर्ग रिसर्चने रिपोर्टमध्य काय म्हटलं आहे?

Hindenburg Report Madhabi Puri Buch : भारतात लवकरच काही मोठे घडणार, अशी पोस्ट केल्यानंतर हिंडनबर्ग रिसर्चने थेट सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच, त्यांचे पती धवल बुच आणि अदाणी समूहात संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अदाणी घोटाळ्यात ज्या कंपन्यांचे पैसे वापरण्यात आले, त्या दोन्ही परदेशी कंपन्या बनावट असून, त्यात सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची भागीदारी असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्चने केला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर भारतात खळबळ उडाली आहे. (Hindenburg Research's Allegations against SEBI Chairperson Madhabi Puri Buch)

ADVERTISEMENT

10 ऑगस्ट रोजी हिंडनबर्ग रिसर्चने वेबसाईटवर यासंदर्भातील रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. एका व्हिसलब्लोअरच्या कागदपत्रातून सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच, धवल बुच आणि अदाणी समूहाचे घोटाळ्यात कनेक्शन असल्याचे हिंडनबर्ग रिसर्चने म्हटले आहे. 

हिंडनबर्ग रिसर्चने काय म्हटलंय?

हिंडनबर्गने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, अदाणी ग्रुप आणि सेबी अध्यक्ष यांच्यात संबंध आहेत. भारताबाहेरील ज्या संस्थांमधील पैशांचा वापर अदाणी समूहातील विनोद अदाणींनी आर्थिक गैरव्यवहारासाठी केला. त्या दोन देशातील संस्थांमध्ये सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांची भागीदारी होती.

हे वाचलं का?

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंच्या सभेदरम्यान ठाण्यात तुफान राडा, काय घडलं? 

माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी 5 जून 2015 रोजी सिंगापूरमधील आयपीई प्लस फंड 1 चे खाते उघडले होते. आयआयएफएल फंडाच्या घोषणेत गुंतवणुकीचा स्त्रोत पगार असल्याचे म्हटले गेले. बुच दाम्पत्याची एकूण गुंतवणूक 10 मिलियन डॉलर आहे. बर्म्युडा आणि मॉरिशस फंडामध्ये दोघांची छुपी हिस्सेदीरी होती, असेही हिंडनबर्गने रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

सेबी अध्यक्ष माधवी बुच, अदाणी समुहात संबंध -हिंडनबर्ग

"अदाणी समूहाच्या हे लक्षात आले की आपले कामकाज सुरू ठेवल्यास, त्यामध्ये कोणताही गंभीर हस्तक्षेप होण्याची जोखीम नाही. अदाणींना वाटणारा आत्मविश्वास आमच्या आधी लक्षात आला होता. त्यामुळे अदाणींचे माधवी पुरी बुच यांच्याशी संबंध असल्याचे सूचित होत होते", असेही हिंडनबर्ग रिसर्चने म्हटले आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ''ठाकरे पवारांच्या घरी बैठका, फडणवीसांसह 'या' नेत्यांना अटक करण्याचा होता प्लॅन''

मॉरिशस फंडची स्थापना इंडिया इन्फोलाईनच्या माध्यमातून अदाणी समूहाच्या एका संचालकांनी केली होती. त्यात माधवी पुरी बुच यांची हिस्सेदारी होती. आजपर्यंत सेबीने अदाणी समूहाविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, असेही हिंडनबर्गने म्हटले आहे.  

ADVERTISEMENT

हिंडनबर्ग रिसर्चचे आरोप निराधार -माधवी पुरी बुच

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी हिंडनबर्ग रिसर्चने केलेले आरोप फेटाळले आहेत. आरोप निराधार असून, आमचे आर्थिक व्यवहार उघड आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >> म्हाडाचा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे 'ही' कागदपत्रे हवीच! 

हे दुर्दैवी आहे की, हिंडनबर्ग रिसर्च, ज्याच्याविरोधात सेबीने कारवाई केली आहे आणि कारण दाखवे नोटीस बजावली आहे. याचे प्रत्युत्तर म्हणून चारित्र्य हनन करण्याचा पर्याय निवडला आहे, असे बुच दाम्पत्याने म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT