किती पगार असल्यावर घर घ्याल? पगार आणि EMI मधला मॅजिकल फॉर्म्युला!
तुमच्या पगारावरून तुम्ही किती महागड घर खरेदी करू शकता आणि किती लोन (Loan) भरू शकता.त्य़ामुळे नेमका किती पगार असल्यावर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
Home Loan Emi Calculator : प्रत्येकाचेच घर खरेदी (Dream House) करण्याचे स्वप्न असते.मात्र हे स्वप्न सध्याच्या घडीला सहजासहजी पुर्ण होईल की नाही असे अनेकांच्या मनात प्रश्न असतात. कारण वाढत्या घरांच्या किंमती (House Price) आणि तुटपुंजा पगार यामुळे अनेकांना ते अशक्य वाटते. मात्र तरी देखील शहरात स्वत:चे घर घेणे? किंवा भाड्यावर राहणे? यामधील कोणता पर्याय फायद्याचा आहे. तर याचे उत्तर तुमच्या पगारात दडलंय. कारण तुमच्या पगारावरून तुम्ही किती महागड घर खरेदी करू शकता आणि किती लोन (Loan) भरू शकता.त्य़ामुळे नेमका किती पगार असल्यावर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, हे जाणून घेऊयात. (how much sallery needed to buy house or flat on home loan emi calculator)
घर खरेदीत सर्वात पहिला प्रश्न समोर येतो, तो म्हणजे, कधी घर खरेदी करायचे आहे? तर या प्रश्नाचे सऱळ सरळ उत्तर आहे की, तुम्हाला किती महागडे घर खरेदी करायचे आणि तु्मचा पगार किती आहे. आता लोनचा सऱळ फॉर्म्युला जाणून घेऊयात. होम लोन किंवा ईएमआय तुमच्या पगारातील 20 ते 25 टक्के हिस्सा असतो. उदाहरण सांगायचे झाले तर, जर तुमचा पगार 1 लाख रूपये आहे, तर तुम्ही 25 हजार रूपये ईएमआयचा हफ्ता सहज भरू शकता. पण जर तुमचा पगार 50 ते 70 हजार रूपये आहे, आणि तुमची ईएमआय 25 हजार असेल तर आर्थिकदृष्ट्या तुमचा निर्णय चुकीचा आहे. यामागचे कारण म्हणजे लोन चुकवायला तुम्हाला साधारण 20 वर्षांचा कालावधी लागणार आहे. अशा परीस्थितीत घर खरेदी करणे चुकीचा निर्णय़ ठरू शकते.
50 ते 70 पगार असल्यास…
पण जर 50 ते 70 हजाराच्या पगारात तुमचा ईएमआय 20 हजारांपेक्षा कमी असेल तर तुम्ही घर खरेदी करू शकता. तुम्ही 25 लाखापर्यंत घर घेऊ शकता. त्यामुळे 20 वर्षांसाठी 20 हजारापेक्षा कमी येईल. पण जर घराची किंमत 30 लाखाच्या घरात असेल आणि तुमचा पगार 50 ते 70 लाख असेल, तर भाड्याचे घरात राहणेच फायद्याचे ठरणार आहे. या दरम्यान दर महिन्याला बचत करण्यावर फोकस करा. आणि ज्यावेळेस पगार 1 लाखापर्यंत पोहोचेल, तेव्हा अधिक डाऊन पेमेंट करून तुम्ही घर खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही जितके अधिक डाऊन पेमेंट कराल तितकी कमी ईएमआय येईल आणि तो तुम्हाला फायद्याचा ठरेल.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
30 ते 35 लाखाचे घर खरेदी करता येईल
आर्थिकदृष्ट्या बोलायचे झाले तर, जर तुमचा पगार 1 लाख रूपये आहे, तर तुम्ही 30 ते 35 लाखांचे घर खऱेदी करण्याचे निर्णय़ घेऊ शकता. दुसरीकडे जर पगार दरमहा दीड लाख रूपये महिना असेल तर 50 लाखाच्या बजेटमध्ये घर खरेदी करू शकता. म्हणजेच पगारातला 25 टक्के हिस्सा होम लोन किंवा ईएमआय असेल.
दरम्यान तुम्ही काय काम करता? तुमचे प्रोफेशन काय आहे? आणि तुमच्या पगारात ग्रोथ आहे की नाही? या आधारावरच निर्णय़ घ्या, हे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT