Maharashtra HSC Result 2023: मोबाइल, mahresults.nic.in वेबसाइटवर कसा पाहाल निकाल?
HSC Result 2023 Online and Offline: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board HSC Result 2023) MSBSHSE बारावीचा निकाल निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे.
ADVERTISEMENT

HSC Results 2023: मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या MSBSHSE बारावीचा निकाल (HSC Result) हा आज (25 मे 2023) दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे. आता निकाल जाहीर होण्यासाठी काही अवघे तास उरल्यामुळे विद्यार्थ्यांची बरीच धाकधूक वाढली आहे. या निकालाकडे आता लाखो विद्यार्थी-पालकाचं लक्ष आहे. (how to check hsc result on website mahresultsnicin and offline maharashtra hsc results 2023)
12 वीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाइनच पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइनच आपल्याला निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र बारावी बोर्डाने बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये पार पडली. बारावीच्या परीक्षेचा निकाल दरवर्षी साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर केला जातो. तीच परंपरा बोर्डाने यंदाही कायम ठेवली आहे.
दरम्यान, यंदाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पाहा बारावीचा निकाल आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन म्हणजेच मोबाइलवर कसा पाहू शकता.