Ganpat Gaikwad : आरोपींचं जेवण, फरशीवर झोपले; भाजप आमदाराची कोठडीत अशी गेली रात्र

भाग्यश्री राऊत

भाजप आमदार गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे, त्यांना तिथे कोणत्या सुविधा दिल्या जाताहेत?

ADVERTISEMENT

BJP Mla Ganpat gaikwad in police custody
BJP Mla Ganpat gaikwad in police custody
social share
google news

Ganesh Gaikwad Latest News : 2 जानेवारी रोजी रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. गणपत गायकवाड हे पोलीस कोठडीत असून, त्यांना घरचं जेवण नाकारण्यात आलं असून, फरशीवरच झोपावं लागलं. कोठडीत ठेवल्यानंतर कोणती खबरदारी घेतली जात आहे, हेच जाणून घ्या…

गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यातील सुप्त संघर्षाला हिंसक वळण मिळालं. आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला.

या प्रकरणात पोलिसांनी आमदार गायकवाड यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गणपत गायकवाड यांना कुठे ठेवण्यात आले आहे?

गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले आहे. पण, त्यांना शनिवारची (3 फेब्रुवारी) रात्र फरशीवरच झोपून काढावी लागली. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी पोलिस काळजी घेताहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp