लग्नाला 10 वर्ष, 3 मुलं… पती-पत्नीची DNA टेस्ट झाली अन् पायाखालची सरकली जमीन…

ADVERTISEMENT

A couple tied in marriage for the last 10 years was shocked when it was found in their DNA report that they are brother and sister
A couple tied in marriage for the last 10 years was shocked when it was found in their DNA report that they are brother and sister
social share
google news

Marriage News : अमेरिकेतील कोलोरॅडोमधून एक विचित्र बातमी समोर येत आहे. १७ वर्षांपासून एकमेकांना ओळखत असलेल्या, १० वर्षांपासून संसार करत असलेल्या आणि ३ मुलं असलेल्या एका जोडप्याच्या आयुष्यात कधीही कल्पना न केलेलं वादळ आलं आहे. सुखवस्तू कुटुंबात अचानक आलेल्या या वादळाने बऱ्याच उलथापालथी घडवल्या आहेत. (A couple tied in marriage for the last 10 years was shocked when it was found in their DNA report that they are brother and sister.)

नेमकं काय घडलं आहे?

सेलिना आणि जोसेफ हे दोघे मागील १७ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. १० वर्षांपूर्वी दोघांनी लग्नही केलं. या १० वर्षांच्या काळात दोघांचा संसार अतिशय उत्तम सुरु होता. दोघांनी ३ मुलांनाही जन्म दिला. पण सेलिनाने अचानक आपली आणि पतीची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. मात्र या डीएनए टेस्टचे रिपोर्ट पाहिल्यावर दोघांच्याही पायाखालची जमीन सरकेल याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.

हेही वाचा : चार मुलं…करोडोची संपत्ती…, तरीही आईला राहावं लागतंय वृ्द्धाश्रमात

टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर दोघांनाही समजलं की जोसेफ हा सेलिनाचा चुलत भाऊ आहे. सेलिनाने तिच्या अनुभवांवर एक पुस्तक लिहिले आहे. ती गंमतीमध्ये म्हणाली, ही बातमी आमच्यासाठी ‘आईस ब्रेकर’ होती. याशिवाय तिने इतर जोडप्यांनाही स्वतःची फॅमिली ट्री तपासण्याचा सल्ला दिला आहे. सेलिनाची ही क्लिप वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत तिच्या या व्हिडीओला ४० लाखांपेक्षा जास्त व्हूज मिळाले आहेत. अनेक लोकांनी या व्हिडीओवर नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यांनी वेगळं व्हायला हवं असा सल्ला अनेकांनी दोघांना दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : RBI Policy: हुश्श! 6 झटक्यानंतर कर्जदारांना दिलासा, EMI च्या वाढीला ब्रेक

सेलिना म्हणाली, जेव्हा पहिल्यांदा कळलं की जोसेफ तिचा चुलत भाऊ आहे तेव्हा तो प्रसंग परीक्षा पाहणारा होता. पण आमचे प्रेम पूर्वीपेक्षा आजही अधिक मजबूत आहे. दोघांनाही घटस्फोटाचा नकारात्मक सल्ला देणाऱ्या दुर्लक्ष केले. आपल्याला ३ मुले आहे आणि आम्ही भाऊ आणि बहिणी आहोत, हे कळल्यावर मी जोसेफला विचारलं, “आपण भाऊ-बहिण आहोत, आपण एकत्र राहणार आहोत का? हे थोडं विचित्र आहे”. पण आम्ही ठरवले की आम्ही जगासाठी बदलणार नाही. आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT