IIT Bombay: विद्यार्थ्याने खाल्लं Non-Veg, बसला हजारो रुपयांचा दणका
आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी मेसमध्ये मांसाहार जेवल्यामुळे नवा वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या जेवणामुळे कॉलेजच्या नियमांचे उल्लघंन होत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना 10 हजारचा दंड ठोठवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
IIT Bombay: भारतातील टॉप इंजीनियरिंग कॉलेजमध्ये (Top Engineering College) आयआयटी बॉम्बेची नेहमीच जोरदार चर्चा असते. मात्र आत हे कॉलेज चर्चेत आले आहे ते वेगळ्याच कारणामुळे. आयआयटी बॉम्बेच्या मेसमध्ये मांसाहार (veg non-veg) खाल्ल्यामुळे विद्यार्थ्यांना 10 हजारचा दंड (10 thousand fine) ठोठवण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना दंड लावण्यात आला आहे, त्यांनी आयआयटीच्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
वेगळ्या टेबलवर बैठक
आयआयटी बॉम्बेच्या हॉस्टेलमध्ये शाकाहारी जेवणाबरोबर वेगवेगळे टेबलांची मांडणी केली आहे. त्याच टेबलवर मांसाहार जेवल्यामुळे विद्यार्थ्यांना दंड ठोठवण्यात आला आहे. या गोष्टीमुळे आता हा वाद सोशल मीडियावरही पोहचला आहे. त्यामुळे आता आयआयटी बॉम्बे कॉलेजच्या धोरणावरच सवाल उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा >> Solapur : मोबाईल ठरला तरुणाच्या आत्महत्येचं कारण, शेतात घेतला गळफास
शाकाहारी जेवणाची व्यवस्था वेगळी
आयआयटी बॉम्बेच्या 12, 13 आणि 14 वसतिगृहांमध्ये हा गोधंळ झाला आहे. या मेसमध्ये शाकाहारी जेवणासाठी सहा टेबल राखून ठेवले आहेत. हा टेबल जैन मेनूच्या आधारावर असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र 28 सप्टेंबर रोजी आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्यांनी या टेबलवर कब्जा करत त्यावरून वाद घालण्यात आला.
हे वाचलं का?
विद्यार्थ्यांना वेगळे का?
जेवणाच्या या प्रकारामुळे मुस्लिम, दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांना वेगळे केले जात असल्याची टीका केली गेली आहे. हा प्रकार मेस कमिटीला कळताच त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र या घटनेचा विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.जेवणावरुन वाद वाढल्यानंतर आयआयटी बॉम्बेच्या मेस कमिटीकडून विद्यार्थ्यांना नोटीस काढून त्यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर मेसमध्ये वातावरण बिघडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा >> मंत्रिमंडळ बैठक: अजित पवारांच्या गैरहजेरीत शिंदे-फडणवीसांनी घेतले दोन मोठे निर्णय!
APPSC कडून निषेध
आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कलमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करुन कॉलेजाच्या नियमांचा निषेध व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT