Govt Jobs : इंजिनिअरिंग, MSc उत्तीर्ण उमेदवारांना इंडियन आर्मीत मोठी संधी, वर्षाला 17-18 लाख CTC
इंडियन आर्मीने इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या आणि M.Sc उत्तीर्ण असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Govt Jobs : इंजिनिअरिंग, MSc उत्तीर्ण उमेदवारांना इंडियन आर्मीत मोठी संधी
17-18 लाख CTC
Indian Army Recruitment : इंडियन आर्मीने इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या आणि M.Sc उत्तीर्ण असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. 12 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीनुसार एकूण 30 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी केवळ अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करण्यास पात्र असून, ही निवड कायमस्वरूपी कमिशन (Permanent Commission) अंतर्गत केली जाईल. या भरती मोहिमेमुळे देशाच्या संरक्षण दलात तांत्रिक अधिकारी म्हणून सेवा करण्याची मोठी संधी तरुणांना मिळणार आहे.
पात्रतेचे निकष
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. ज्यांचा जन्म 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2007 या कालावधीत झाला आहे, ते सर्व उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेबाबत सांगायचे झाले तर, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील बी.ई. (BE), बी.टेक. (B.Tech) किंवा एम.एस्सी. (M.Sc) पदवी असणे अनिवार्य आहे. पात्र उमेदवारांची निवड प्रामुख्याने त्यांच्या पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट करून केली जाणार आहे.
हे ही वाचा : सरन्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना फटकारलं, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
वार्षिक 17 ते 18 लाख सीटीसी
प्रशिक्षण कालावधीत निवडक उमेदवारांना दरमहा 56,100 रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाईल. यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांची नियुक्ती 'लेफ्टनंट' या पदावर केली जाईल. नियुक्तीनंतर वेतन श्रेणी स्तर 10 नुसार 56,100 ते 1,77,550 रुपयांपर्यंत पगार मिळेल. भत्त्यांसह वार्षिक सीटीसी (CTC) साधारणपणे 17 ते 18 लाख रुपयांच्या घरात असेल. लष्करातील या प्रतिष्ठित पदासोबतच उमेदवारांना आकर्षक वेतन आणि विविध भत्ते देखील दिले जाणार आहेत.
हे ही वाचा : पुण्यात बॉम्ब ठेवणारा आरोपी सापडला, महाराष्ट्र ATS ने कुठून उचललं?
अर्जाची शेवटची तारीख काय?
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.joinindianarmy.nic.in) भेट द्यावी. अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या कट-ऑफ गुणांची घोषणा जून 2026 मध्ये केली जाण्याची शक्यता आहे.









