ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधीच पाकिस्तानमध्ये खळबळ! ISI ने 'मुंबई 26/11' च्या मास्टरमाईंडला केलं अंडरग्राऊंड

मुंबई तक

26/11 Mumbai attack mastermind, Zakiur Rehman Lakhvi : मुंबई 26/11 दहशतवादी हल्लाच्या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आलीय. या हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रहमान लख्वीला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने भूमिगत केलं आहे.

ADVERTISEMENT

26/11 Mumbai attack mastermind Zakiur Rehman Lakhvi
26/11 Mumbai attack mastermind Zakiur Rehman Lakhvi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

झकीउर रहमान लख्वी मुंबई 26/11 चा मास्टरमाईंड 

point

'असा' झाला झकीउर रहमान लख्वीचा पर्दाफाश

point

लख्वीचा 'तो' व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

26/11 Mumbai attack mastermind, Zakiur Rehman Lakhvi : मुंबई 26/11 दहशतवादी हल्लाच्या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आलीय. या हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रहमान लख्वीला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने भूमिगत केलं आहे. गेल्या महिन्यात लख्वी पाकिस्तानात मौज मजा करत असल्याचं समोर आलं होतं. लख्वीचा व्यायाम करतानाचा  व्हिडीओ व्हायरल झाला होता. आज तकने या व्हिडीओचा खुलासा केला. त्यानंतर लख्वीवर कारवाई केल्याची माहिती समोर आलीय.

व्हिडीओत दिसत असलेल्या अनेक लोकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट बंद केले आहेत. अमरिकेनेही लख्वीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं होतं. तसच भारताचाही वॉन्टेड दहशतवादी आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधीच पाकिस्तानच्या गुप्तचर विभागात खळबळ उडाली आहे. आज तकने लख्वीच्या व्हिडीओच्या माध्यमातून पाकिस्तानची पोलखोल केलीय. झकीउर रहमान लख्वी लश्कर-ए-तोएबाचा ऑपरेशनल चीफ आहे. लख्वी पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याचं बोललं जात होतं. परंतु, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचा पर्दाफाश झाला.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपये? CM होताच फडणवीसांनी थेट सांगितलं

झकीउर रहमान लख्वी 26/11 चा मास्टरमाईंड 

झकीउर रहमान लख्वी मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. लख्वी पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असेल, अशी चर्चा होती. परंतु, लख्वीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जाणार आहेत आणि त्याचठिकाणी अतिरेकी लख्वी व्हीव्हीआयपींसारखा व्यायाम करत असल्याचं समोर आलंय.

हे ही वाचा >> 6 December 2024 Gold Rate: थांबा जरा! सोनं खरेदी करताय? मुंबईतील आजचा भाव वाचून धडकीच भरेल

पाकिस्तानच्या न्यायालयाने लख्वीला तुरुंगात टाकल्याचं म्हटलं होतं. पण लख्वी लाहौर आणि रावलविंडीत बिंधास्तपणे फिरत असल्याचं आता समोर आलंय. लख्वीला संयुक्त राष्ट्र परिषदेने अतिरेकी म्हणून घोषितही केला होता. लख्वीचा व्हिडीओ त्या शहरातील आहे, जिथे भारतीय क्रिकेट संघाला सामना खेळायचा आहे. लख्वीचा पाकिस्तानमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं टीम इंडियाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp