JNU Controversy : ‘भगवा जलेगा… फ्री कश्मीर…; JNU मधील भिंतीवर वादग्रस्त घोषणा
दिल्लीच्या जेएनयूमध्ये अनेक वाद याआधीही उफाळून आले आहेत. वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांमुळे वाद विकोपाला जाऊन हाणामारीचेही प्रसंग घडले आहेत. त्यातच आता जेएनयूतील भिंतीवर वादग्रस्त वाक्य लिहिल्यामुळे वातावरण तापले आहे.
ADVERTISEMENT
JNU Controversy: दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (Jawaharlal Nehru University) म्हणजेच जेएनयू आणि वाद हे आता समीकरण झाले आहे. कधी काश्मीर तर कधी भगव्या ध्वजावरून दोन गट आमने सामने येत आहेत. त्यातच जेएनयूमधील निवडणुकाही वादाचे मूळ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आताही जेएनयूच्या कॅम्पसमध्ये (JNU Campus) आता पुन्हा एकदा भिंतीवर भगवा जलेगा, मोदी तेरी कब्र खुदेगी आणि कश्मीर फ्री (Kashmir Free) अशा स्वरुपाचे स्लोगन (Slogan) भिंतीवर लिहिली गेल्यामुळे वाद टोकाला गेला आहे.(jnu controversial slogans burn bhagwa jalega free kashmir modi teri kabra khudegi probe viral saffron)
ADVERTISEMENT
भिंतीवर वादग्रस्त वाक्यं
जेएनयू कॅम्पसमध्ये वादग्रस्त वाक्यं लिहिली असली तरी ती लाल रंगाच्या शाहीने लिहिली आहेत. जेएनयूच्या भिंतीवर ही वाक्य लिहिण्यात कुणाचा हात आहे, आणि ती का लिहिली गेली याची माहिती मात्र अजून मिळू शकली नाही. भिंतीवर लिहिलेली ही वादग्रस्त वाक्य दिसताच दिल्ली पोलिसांनी आता कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा >> Mumbai 26/11 Attack : मोस्ट वॉन्टेड अतिरेकी कैसर फारुकची हत्या, Video Viral
स्वतंत्र काश्मिर…
जेएनयू कम्पसमधील काही भिंतीवर ही वादग्रस्त वाक्य लिहिलेली रविवारी दिसून आली. जेएनयूच्या स्कूल ऑफ लँग्वेजेस विभागाच्या भिंतीवर ही वाक्यं लिहिलेली आढळून आली आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हा मजूकर शनिवारी लिहिल्याचे आढळून आले आहे. जेएनयूमधील लिहिलेल्या या भिंतींवर ठिकठिकाणी स्वतंत्र काश्मीर आणि आयओके म्हणजेच भारतव्याप्त काश्मीरवर लिहिलेलं आढळून आले आहे.
हे वाचलं का?
विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशी
या प्रकरणी जेएनयू प्रशासनाकडून अजून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य आले नाही. मात्र लवकरच या वादग्रस्त घोषणा हटवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हा वादग्रस्त मजूकर कुणी लिहिला त्याची चौकशी करण्यात येत असून पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.
हे ही वाचा >> Odi World Cup : ‘हा माझा शेवटचा वर्ल्ड कप’, टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT