Ritu Karidhal: ‘चांद्रयान-3’ चे कणखर नेतृत्व करणारी ही ‘रॉकेट वुमन’ आहे तरी कोण?

रोहिणी ठोंबरे

आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत. आज भारत श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 लाँच करेल. चांद्रयान-3 च्या लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये एकूण सहा पेलोड्स जात आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Chandrayaan-3 : Ritu Karidhal : आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत. आज भारत श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 लाँच करेल. चांद्रयान-3 च्या (Chandrayaan-3) लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये एकूण सहा पेलोड्स जात आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘रॉकेट वुमन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंतराळ शास्त्रज्ञ रितू करीधल श्रीवास्तव (Ritu Karidhal Shrivastava) या मिशनचे नेतृत्व करत आहेत. ज्यांच्यावर या महत्त्वाच्या मिशनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्या रितू करिधल आहेत तरी कोण? हे सविस्तर जाणून घेऊयात. (Lucknow’s Rocket Woman Ritu Karidhal will lead Chandrayaan-3 mission Get Know About Her)

लखनौची ‘रॉकेट वुमन’ करणार चांद्रयान-३ मोहिमेचे नेतृत्व!

चांद्रयान-3 उतरवण्याची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ रितू करीधल श्रीवास्तव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टरच्या भूमिकेत रितू करीधल दिसणार आहे. लखनौमध्ये राहणाऱ्या आणि मंगळयान मोहिमेत आपले कौशल्य दाखविणाऱ्या रितू चांद्रयान-3 सह यशाचीही उंच भरारी घेणार आहेत. रितू यांना त्यांच्या आधीच्या मिशनमधील भूमिका लक्षात घेऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे.

वाचा : रश्मी वहिनीसमोरच बोललो, फडणवीसांनी सांगितला ‘मातोश्री’तला प्रचंड इंटरेस्टिंग किस्सा

रितू या मंगळयान मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या. लखनौच्या रितूंनी जेव्हा चांद्रयान-मिशन 2 मध्ये मिशन डायरेक्टरची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

रितू करिधल यांची कारकीर्द

लहानपणापासून रितू करीधल लखनौमध्येच मोठ्या झाल्या आहेत. त्यांनी लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एमएससी केले आहे. विज्ञान आणि अवकाशातील आवड पाहून रितूंनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. यानंतर त्यांनी इस्रोमध्ये नोकरीला सुरुवात केली. एरोस्पेसमध्ये पारंगत असलेल्या रितूंचे करिअर यशांनी भरलेले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp