Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईत मिळणार 9 लाखात घर

ADVERTISEMENT

mhada lottery 2023 announced 5311 budget homes near mumbai price and last date for apply
mhada lottery 2023 announced 5311 budget homes near mumbai price and last date for apply
social share
google news

mhada lottery 2023 : जगातील प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की, त्याचं स्वतःचं असं घर असावे. मग ते घर दिल्ली किंवा मुंबईत असेल तर मग माणसांच्या आनंदाला पारावर उरणार नाही. मात्र हे सगळं वाटत असलं तरी सध्याच्या महागाईच्या काळात मात्र जमीन घेऊन त्यावर घर बांधणं हे प्रत्येकालाच शक्य नाही. जर तुम्हीही तुमच्या स्वप्नातील घर घेऊ पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण आता आपल्या बजेटमध्ये (Budget) तुम्हाला मुंबईजवळ (Mumbai) घर मिळू शकणार आहे. कारण तुम्हाला आता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (mhada) ने यावर्षी दुसऱ्यांदा 5,311 घरांच्या विक्रीसाठी दुसऱ्यांदा लॉटरी पद्धतीची घोषणा करण्यात आली. (mhada lottery 2023 announced 5311 budget homes near mumbai)

अर्ज लवकर करा

म्हाडाच्या कोकण बोर्डाकडून ठाणे, पालघर आणि रायगडसह मुंबईजवळील सॅटेलाइट टाउनमध्ये लॉटरीद्वारे 5,311 घरांची विक्री करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यापैकी 1 हजारहून अधिक घरं ही प्रधानमंत्री आवास योजना (PMआवास योजना) म्हणजेच PMAY द्वारे विकली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. तर 18 ऑक्टोबरपर्यंत रक्कम स्वीकारले जाणार असून त्या लॉटरीचा निकाल 7 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

हे ही वाचा >> ‘खासदार बायका नाचवतो, जिल्ह्यात फिरला तर कपडेच…’, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाची शिंदेंच्या खासदाराला धमकी

स्वस्त घरं इथं मिळणार

म्हाडाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या या सोडतीमधील घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही घरं वसई, विरार, टिटवाळा, ठाणे, कल्याण, मुंब्रा या मुंबईजवळच्या ठिकाणी आहेत. त्यांच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले तर 9 लाख रुपयांपासून ते 49 लाखापर्यंत निश्चित करण्यात आली आहेत. म्हाडाने लॉटरीअंतर्गत मुंबईजवळ विकल्या जाणाऱ्या घरांपैकी सर्वात स्वस्त घरं ही वसईमध्ये 9.89 लाख रुपयांना आणि विरारमध्ये 49.81 लाख रुपयांपर्यंत महाग अशी घरं असणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या वेबसाईटवर मिळणार माहिती

म्हाडाच्या या घरांच्या क्षेत्रफळाबद्दल विचार करत असाल तर सर्वात लहान अपार्टमेंट 258 स्क्वेअर फूट असणार आहे. तर आणि सर्वात मोठ्या अपार्टमेंटचे क्षेत्रफळ 667 स्क्वेअर फूट असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in/ अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

हे ही वाचा >> शिवसेना प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय होणार? उज्वल निकम यांचं विश्लेषण

मुंबईसह या ठिकाणीही मिळणार घर

म्हाडाकडून मुंबई लॉटरी 2023 च्या माध्यमातून ही नवीन योजना जाहीर केली आहे. जे 6 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झाले होते आणि 27 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी असणार आहे. पुणे मंडळाने पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमधीलही घरांची माहिती देण्यात आली आहे. म्हाडाने सांगितले आहे की, 5 हजार 863 घरांपैकी 2 हजार 445 घरं ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर या घरांची विक्री केली जाणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT