HSC Result 2024 : संभाजीनगरची तनिशा राज्यात अव्वल, बारावीत मिळवले 100 पैकी 100 मार्क

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra hsc result 2024 chhatrapati sambhajinagar student tanisha sagar bormanikar maharashtra topper 2024 class 12th
छत्रपती संभाजीनगरमधील तनीषा बोरमणीकर या तरूणीने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
social share
google news

Tanisha Sagar Bormanikar, HSC Result 2024 : इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे, तर कोकण विभाग अव्वल ठरला आहे.  छत्रपती संभाजीनगरमधील (chhatrapati sambhajinagar) तनीषा बोरमणीकर  (Tanisha Sagar Bormanikar) या तरूणीने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने कॉमर्समध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. तनीषाच्या या यशानंतर आता सर्वस्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (maharashtra hsc result 2024 chhatrapati sambhajinagar student tanisha sagar bormanikar maharashtra topper 2024 class 12th) 

तनीषा बोरमणीकर ही छत्रपती संभाजी नगरमधील देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. तिने बारावीच्या लेखी परीक्षेत एकूण 582 गुण मिळवले होते. आणि स्पोर्टस अ‍ॅक्टीव्हिटीत भाग घेतल्यामुळे तिला अतिरिक्त 18 गुण देण्यात आले होते. त्यामुळे तनीषाने 600 पैकी 600 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिचे खूप कौतुक होत आहे.

हे ही वाचा : बिल्डर विशाल अग्रवाल पोलिसांना संभाजीनगरमध्ये कसा सापडला?

तनीषा केवळ अभ्यासातच नाही तर खेळातही अव्वल आहे. ती एक उत्तम बुद्धिबळपटू आहे आणि तिने 8 वर्षांखालील स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही तिने अनेकदा भाग घेतला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तनीषाने तिच्या या यशाचे श्रेय तिचे पालक आणि देवगिरी महाविद्यालयातील प्राध्यापकांना दिले आहे. त्याचसोबत तिचे आई वडील तिच्या या यशावर म्हणतात की, तनीषाला लहानपणापासून सर्व गोष्टींसाठी स्वातंत्र्य दिले होते, त्यामुळेच आज तिने हे मोठे यश मिळवले आहे. 

दरम्यान तनीषाची आई सीए असून वडील आर्किटेक्ट आहेत. तनीषाला तिच्या आईप्रमाणेच सीए क्षेत्रात करिअर करायचं आहे.यासोबत भारतीय नागरी सेवांमध्ये सामील होण्याचे देखील तिचे स्वप्न आहे. परंतु सध्या ती तिच्या सीए अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करत आहे. तनीषाने खेळाबरोबरच अभ्यासासाठी वेळेचे नियोजन करून यश संपादन केले आहे. आव्हाने स्वीकारण्याची आणि बुद्धिबळाच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची सवय असल्यामुळे परीक्षा आणि अभ्यासाचा ताण नसल्याचे तनीषाने सांगितले आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Lok Sabha : कपिल पाटलांचा 'तो' Video रोहित पवार चिडले!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT