Pune Accident : पुण्याचा बिल्डर विशाल अग्रवाल पोलिसांना संभाजीनगरमध्ये कसा सापडला?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pune porsche accident news accuse father builder vishal agrawal arrested from sambhaji nagar pune news
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत बिल्डर विशाल अग्रवालला संभाजीनगरमधून (Sambhaji Nagar) अटक केली आहे.
social share
google news

Pune Porsche Accident News  : पुण्याच्या पोर्शे कार अपघाताच्या घटनेने राजकीय वातावरण तापल्यानंतर आता पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र तो फरार असल्याने त्याला अटक करता आली नव्हती.आता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत बिल्डर विशाल अग्रवालला संभाजीनगरमधून (Sambhaji Nagar) अटक केली आहे. दरम्यान अग्रवालने पोलिसांना चकमा देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता. मात्र तरी देखील त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. आता पोलिसांनी नेमकी त्याला कशी अटक केली? हे जाणून घेऊयात.  (pune porsche accident news accuse father builder vishal agrawal arrested from sambhaji nagar pune news) 

ADVERTISEMENT

पुण्याच्या कल्याणीनगर भागात विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मंद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवून दोघांचा जीव घेतला होता. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शिंनी आरोपी मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले होते.  या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी वडील विशाल अग्रवालवर देखील गुन्हा दाखल केला होता. मात्र तो फरार झाला होता.आता त्याला पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली आहे. 

हे ही वाचा : Lok Sabha : कपिल पाटलांचा 'तो' Video रोहित पवार चिडले!

विशाल अग्रवालने पोलिसांना चकमा देण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला होता. पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी त्याने त्याची नेहमीची कार आणि ड्रायव्हर मुंबईच्या दिशेने पाठवला होता. आणि दुसरी कार दुसऱ्या चालकासह कोल्हापूरच्या दिशेने गोव्याला रवाना केली होती.आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये ते स्वतः मुंबईला गेल्याची माहिती दिली होती. 

हे वाचलं का?

विशाल अग्रवालने स्वतःचा फोन बंद करून नवीन नंबर वापरायला सुरुवात केली होती. आणि तो त्याच्या मित्राच्या गाडीतून संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाला होता. संबंधित गाडीचा  जीपीएसद्वारे त्याचा शोध घेण्यात आला. यानंतर पुणे गुन्हे शाखेने पाठवलेल्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची ओळख पटवली. आणि विशाल अग्रवाल याला अखेर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. आता त्याला उद्या पुण्यातील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : HSC Results 2024: राज्यात '12वी'चा निकाल जाहीर, मुंबईचा कितवा क्रमांक?   

दरम्यान या प्रकरणतील इतर आरोपी हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपीची 24 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT