सांगली : वडील मुलीला परीक्षेसाठी घेऊन गेले अन् इकडं मुलाचा करुण अंत, हर्षद आणि जगदीशसोबत काय घडलं?
वडील मुलीच्या CET परीक्षेसाठी तिला घेऊन गेले होते. म्हणून मासेमारीचे काम पाहण्यासाठी हर्षद आणि जगदीश तलावाकडे गेले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वडील मुलीला परीक्षेसाठी घेऊन गेले अन् इकडं मुलाचा करुण अंत
हर्षद आणि जगदीशसोबत काय घडलं?
Sangli News, स्वाती चिखलीकर : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सनमडी येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. सनमडी येथे तलावात पोहत असताना दोन शाळकरी मुलांचा अत्यंत दुर्दैवी अंत झालेला आहे. हर्षद संजय कांबळे (15) व जगदीश वसंत मोरे वय (14) अशी मयत झालेल्या दोन्ही मुलांची नावे आहेत. हे दोघेही कोण्णीकोनूर (ता. जत) येथील रहिवासी आहेत. पत्रकार असलेले संजय कांबळे यांचा हर्षद हा सुपुत्र असून त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती, तर जगदीशने नववीची परीक्षा दिली होती.
दोघे मित्र तलावात गेले अन्..
अत्यंत सोज्वळ प्रेमळ आणि वडिलांच्या प्रत्येक कामामध्ये सहकार्य करणाऱ्या हर्षदचा असा अत्यंत करूण अंत झाल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. हर्षदसोबत आणि जगदीश हे दोघे जण आज तालुक्यातील सनमडी गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या तलावामध्ये गेले होते. पत्रकार संजय कांबळे यांचा मासेमारीचा व्यवसाय असून या तलावातील मासेमारीचा ठेका त्यांना मिळालेला होता. तेथे मासेमारी सुरु होती.
हे ही वाचा : रुममध्ये पार्टी, दारु अन् शरीरसंबंध; नंतर प्रेमीयुगुलाचा थेट मृत्यू, नेमकं काय घडलं?
पाण्याचा अंदाज न आल्याने..
संजय कांबळे आज मुलीच्या CET परीक्षेसाठी तिला घेऊन गेले होते. म्हणून मासेमारीचे काम पाहण्यासाठी हर्षद आणि जगदीश तलावाकडे गेले होते. त्यासाठी ते पाण्यात उतरले होते. त्यांना पोहायला येत नव्हते. ते तलावाच्या कडेनेच पाण्यातून चालत होते. पण एकेठिकाणी असलेल्या खोलगट भागात ते आले असता तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले व त्यांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा : भावासाठी जेवण बनवलं, अन् नंतर आली मृत्यूची बातमी..., दिव्यांकासोबत काय घडलं?
मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द
संख व उमदी य दोन्ही ठिकाणी शवविच्छेदन करण्याची सोय नसल्याने मृतदेह जत येथे आणण्यात आले. तेथे ती प्रक्रिया पूर्ण होऊन मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत.









