Maharashtra weather: राज्यात 'ऑक्टोबर हिट'ला सुरूवात? 'या' जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा!
Mumbai Weather Forecast Today : राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. मात्र आता मुंबईसह अनेक भागांत पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. तसेच उकाड्यालाही सामोरे जावे लागत आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Weather Forecast Today : राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. मात्र आता मुंबईसह अनेक भागांत पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. तसेच उकाड्यालाही सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत आता राज्यात ऑक्टोबर हिटला सुरूवात झाली आहे का? पाऊसाची स्थिती कशी असेल? त्याचबरोबर यंदा थंडीचा कडाका कसा राहील? याविषयी आज (03 ऑक्टोबर) सविस्तर जाणून घेऊया. (maharashtra Weather Forecast heavy rainfall october heat mumbai pune today 03 october 2024 know IMD weather report)
मुंबई आणि उपनगरात महिन्याभरापेक्षा अधिक काळापासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून रिमझिम पाऊस असे वातावरण होते. मग परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आणि आता विश्रांती घेतली. त्यामुळे, आता मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 2 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा : पुण्यात टोळक्यांचा थरार! IT इंजिनिअरच्या कुटुंबाचा 40 जणांकडून जीवघेणा पाठलाग, CCTV मध्ये कैद
तसेच, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर थंडीचा कडाकाही अधिक राहील. ऑक्टोबरमध्ये देशाच्या बहुतेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यताही वर्तविण्यात आल्याने ऐन दिवाळीत थंडीसह पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आज 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडू शकतो. आज 3 सप्टेंबर रोजी मुंबईचं कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Horoscope In Marathi : नवरात्रीच्या उत्सवात 'या' राशींचं खुलणार नशीब! कुणाला मिळणार भरमसाट पैसा? वाचा एका क्लिकवर
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात 2 दिवस आभाळ ढगाळ असेल, इथं काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो. पुण्याचं तापमान आज कमाल 26 अंश सेल्सिअस आणि किमान 20 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
विदर्भाच्या काही भागांमध्ये हवामान विभागानं मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. मराठवाड्यात 2-3 दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT